नवी दिल्ली : विद्यापीठांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर योग अभ्यासक्रम सुरू करण्याच्या योजनेवर विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) सध्या राबत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग प्रशिक्षणास प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न चालवले आहेत, या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. याअंतर्गत विद्यापीठांमध्ये पुढील शैक्षणिक सत्रापासून योग संदर्भातील विभाग स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, प्रस्तावावर काम सुरू आहे. योग विषयावर संशोधनालाही मोठा वाव आहे, असे काही वर्गांचे मत आहे. एका सूत्रांच्या मते, याबाबत येत्या दिवसात घोषणा केली जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकारानंतर संयुक्त राष्ट्राने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला होता. गतवर्षी पहिल्या आंतरराष्ट्रीय योगदिनी यूजीसीने सर्व संस्था व विद्यापीठांना विविध कार्यक्रम आयोजित करण्यासोबतच योग प्रदर्शनी, आॅनलाईन निबंध स्पर्धा आदींचे आयोजन करण्यास सांगितले होते.
विद्यापीठांत सुरू होणार योग अभ्यासक्रम!
By admin | Published: January 04, 2016 2:54 AM