नवी दिल्ली- भाजपासह मोदींच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस घट होत असल्याचं सूचक विधान एका राजकीय नेत्यानं केलं आहे. स्वराज इंडियाचे संस्थापक अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी भाजपाच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस घट होत असल्याचं म्हटलं आहे. पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे विधान केलं आहे. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या खासदारांची संख्या 100नं कमी होईल, असंही ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. काँग्रेस अजूनही झोपेत आहे, तसेच काँग्रेस एक अयोग्य पक्ष असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. यादव यांनी स्वतःच्या पक्षाकडून जनआंदोलन सुरू केलं आहे. तसेच चांगलं काम करणाऱ्या लोकांना त्यांनी समर्थन दिलं आहे. यादव म्हणाले, भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस घट होत चालली आहे. त्याची भविष्यवाणी करण्यासाठी कोणत्याही राजकीय विश्लेषकाची गरज नाही. ते सर्व स्पष्टच आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रदर्शनाचा हवाला देत त्यांना काँग्रेस राजकारणात अयोग्य पार्टी असल्याचंही म्हटलं आहे. काँग्रेसला कोणत्याही संधीचा योग्य फायदा उचलता येत नाही. काँग्रेस अजूनही झोपेतच आहे. त्यांची झोप अद्यापही उडालेली नाही. हा निष्काळजीपणा आहे. जर ते या तीन राज्यांतील विजयानंतर 2019चं लोकसभा जिंकण्याचं स्वप्न पाहत असतील, तर ते मूर्ख स्वर्गातच आहेत, असं म्हणावे लागेल. भाजपामध्ये उदासीनता नाही. भाजपा देशासाठी घातक असली तरी ती सक्रिय आहे. भाजपा देशाला विनाशकारी मार्गावर घेऊन जात असल्याची टीकाही योगेंद्र यादव यांनी केली आहे.
"मोदींच्या लोकप्रियतेत घट, लोकसभा निवडणुकीत 100 जागांचं होणार नुकसान"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 8:51 AM