शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

Lakhimpur Kheri Violence: Yogendra Yadav शेतकरी आंदोलनातून महिनाभरासाठी निलंबित, लखीमपूरमध्ये मारल्या गेलेल्या भाजपा कार्यकर्त्याच्या कुटुंबाची भेट घेल्याने कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 9:57 AM

Yogendra Yadav suspended: Samyukt Kisan Morchaचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते Yogendra Yadav यांनी लखीमपूर-खेरी हिंसाचारात (Lakhimpur Kheri Violence) मारल्या गेलेल्या BJP कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याने ४६ शेतकरी संघटनांच्या समुहाने त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई केली आहे.

नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेते योगेंद्र यादव यांना आंदोलनातून महिनाभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी लखीमपूर-खेरी हिंसाचारात मारल्या गेलेल्या भाजपा कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याने ४६ शेतकरी संघटनांच्या समुहाने त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई केली आहे. लखीमपूर-खेरी येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये चार शेतकरी, एक पत्रकार, दोन भाजपा कार्यकर्ते आणि एका ड्रायव्हरचा समावेश होता.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार पंजाबमधील शेतकरी संघटनांनी केलेल्या मागणीनंतर योगेंद्र यादव यांच्याविरोधात हा निर्णय गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. निलंबनाच्या कालावधीत योगेंद्र यादव शेतकऱ्यांच्या बैठकांमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. याबाबत यादव यांच्या निकटवर्तीय सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, यादव यांनी गेल्या आठवड्यात भाजपा कार्यकर्त्याच्या कुटुंबाची भेट घेतली होती. कारण त्यांची भेट घेतली पाहिजे, असे त्यांना वाटले होते. लखीमपूर-खेरीमध्ये झालेल्या हिंसाचाराचे आरोप केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर झाले होते. त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली होती.

भारतीय किसान युनियन दोआबाचे अध्यक्ष मंजित सिंग राय यांनी सांगितले की, या प्रकरणी ३२ शेतकरी संघटनांचे एकमत होते. तसेच संघटनांकडून यादव यांनी सार्वजनिकरीत्या माफी मागावी अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, यादव हे भाजपा कार्यकर्त्याच्या कुटुंबाला भेटण्यास गेल्याने दु:खी नव्हते. मात्र याबाबत आधी शेतकरी संघटनांना कल्पना न दिल्याने माफी मागण्यास तयार आहेत.

हत्या प्रकरणात नाव आल्यानंतर पाच दिवसांनी आशिष मिश्रा याला अटक झाली होती. दरम्यान, ही घटना घडली तेव्हा एसयूव्हीमध्ये दिसलेल्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच यामध्ये सुमित जयस्वाल याचाही समावेश आहे. तो व्हायरल व्हिडीओमध्ये पळून जाताना दिसत आहे. शेतकऱ्यांकडून झालेल्या दगडफेकीमुळे गाडीवरचे नियंत्रण सुटले, अशा प्रकारची तक्रार त्याने पोलिसांकडे केली होती. शेतकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत ड्रायव्हर, मित्र आणि भाजपाचे दोन कार्यकर्ते मारले गेल्याचे त्याने म्हटले होते. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे.  

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारFarmers Protestशेतकरी आंदोलन