गोरखपूर - एकीकडे सीमेवर चीनकडून घुसखोरी सुरू असतानाच दुसरीकडे नेपाळनेही सीमाप्रश्नवरून कुरापतखोरी करून भारताची चिंता वाढवली आहे. चीनच्या इशाऱ्यावर चालत असलेल्या नेपाळने दोन्ही देशांमध्ये शेकडो वर्षांपासून सुरू असलेला रोटीबेटी व्यवहारही मोडीत काढण्याइतपत मजल मारली आहे. मात्र दोन्ही देशांमधील संबंधामध्ये आलेली कटुता आणि वैरत्व मिटवण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, अशी चर्चा आहे.
गोरखनाथ मंदिर आणि सर्वसामान्य लोकांमधील चांगल्या संबंधांच्या मदतीने दोन्ही देशातील संबंधांची पुनर्स्थापना होऊ शकते. त्याचं कारण म्हणजे नाथ संप्रदायाचे केंद्र असलेले गोरखपूर येथील गोरक्षपीठ आणि गोरक्षपीठाधीश्वर यांना नेपाळमधील जनमानसात श्रद्धेचे स्थान आहे.
सध्याचे गोरक्षपीठाधीश्वर योगी आदित्यनाथ यांनी नेपाळला आपल्या राजकीय सीमांची आखणी करताना तिबेटची काय अवस्था झाली, ते विचारात घ्यावे असा सल्ला दिल्ला होता. मात्र योगींच्या या सल्ल्यामुळे नेपाळचे पंतप्रधान ओली खूप नाराज झाले होते. मात्र नेपाळ शोध अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. प्रदीप राव यांनी सांगितले की, नाथपंथ आणि नेपाळचा संबंध-सांस्कृतिक आणि धार्मिक पातळीवर खूप महत्त्वपूर्ण आहे. गोरखनाथ हे नेपाळचे राजगुरू होते. तसेच नेपाळच्या मुद्रांवर गोरखनाथ यांचे नाव असते. सध्या या मुद्रेवर पृथ्वीनाथ यांची कट्यार मुद्रित केलेली आहे. कुठल्याही देशाची राजमुद्रा ही त्या देशाचे प्रतीक असते. ज्या प्रकारे भारतात अशोकचक्र आणि महात्मा गांधींची प्रतिमा मुद्रित केलेली असते. त्याप्रमाणेच नेपाळच्या मुद्रेवर गोरखनाथ आणि नाथपंथाशी संबंधित प्रतीके मुद्रित केली जातात. त्यांचा तेथील जनमानसावर मोठा प्रभाव आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्यानंतर हा देश झाला सावध, लष्कराकडे सोपवली मोठी जबाबदारी
भारत-चीनमधील तो करार, ज्यामुळे सीमेवर होत नाही गोळीबार....
त्या प्रस्तावाबाबत रशियाने घेतली भारताला प्रतिकूल भूमिका, चीनला दिले झुकते माप
ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली
गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन
तेथील डाव्या सरकारलासुद्धा ही प्रतिके हटवणे शक्य झालेले नाही. मात्र भारतालाही भारत आणि नेपाळमधील संबंधांचा दुवा म्हणून या गोष्टीचा कधी फायदा घेता आलेला नाही. जर तसा फायदा घेतला असता तर आज ही वेळ आली नसती. भारत आणि नेपाळमधील सांस्कृतिक संबंधांचा विचार केल्यास ती गोरखनाथ मंदिराशिवाय पूर्ण होणार नाही. गोरखनाथ मंदिराच्या पीठाधिश्वरांना नेपाळी जनता आजही गोरखनाथचे प्रतिनिधी मानते, असे प्रदीप यांनी सांगितले. त्यामुळे या सांस्कृतिक संबंधांच्या माध्यमातून दोन्ही देशांतील बिघडलेले राजकीय संबंध दुरुस्त करू शकतात.