शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळणार? CM योगी आदित्यनाथांनी सांगितलं गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 21:58 IST

उत्तर प्रदेशात पुढी वर्षी म्हणजेच 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा दावा केला आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशात पुढी वर्षी म्हणजेच 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा दावा केला आहे. भाजप 2022 च्या विधानसभा निवडणुकीत 300 हून अधिक जागा जिंकेल, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. (Yogi Adityanath claims bjp will win more than 300 seats in uttar pradesh)

यावेळी योगी आदित्यनाथांनी दावा केला, की उत्तर प्रदेशात 40 लाख लोकांना घर देण्यात आले आहे. दोन कोटीहून अधिक लोकांना शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश विधानभा निवडणुकीत भाजप 300 हून अधिक जागा जिंकेल. यात कसलीही शंका नाही. ते म्हणाले, आता उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था एक उदाहरण बनले आहे. यूपीत अनावश्यक घटकांना स्थान नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबरोबरच तरुणांना नोकरी देण्यापर्यंत राज्यात अनेक कामे झाली आहेत. अनेक योजनांच्या माध्यमाने तरुणांना रोजगार देण्यात आला आहे. आता उत्तर प्रदेशात सर्वात कमी बेरोजगारी दर दिसत आहे. 

UP Election: फेसबुकवर योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा अखिलेश यादव अधिक पॉप्युलर!; हे आकडे काय दर्शवतात?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी सुरू -सीएम योगी म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लोकांना तात्पूरता त्रास झाला. मी अजूनही म्हणत आहे, की कोरोना नियंत्रणात आहे. पण अद्याप व्हायरस कमजोर झालेला नाही. यामुळे सावध राहण्याची आश्यकता आहे. ज्या दिवशी यूपीत कोरोना पीकवर पोहोचला होता, त्या दिवशी 38 हजार रुग्ण आढळले होते. योगी म्हणाले, सप्टेंबर 2020 मध्ये आम्ही कोरोना नियंत्रणात आणला होता. ऑक्टोबरमध्ये अयोध्येत दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. याच बोरब लोकांना 'दो गज दूरी, मास्क है जरूरी', असा संदेशही देण्यात आला. उत्तर प्रदेशात एक दिवस केवळ 85 रुग्णच आढळले होते. मात्र, आपण टेस्टिंग सातत्याने वाढवत राहिलो.

Religious conversion case: 1000 हून अधिक लोकांचे धर्मांतरण! योगी सरकारची स्ट्रिक्ट अ‍ॅक्शन, दिले मोठे आदेश 

मुख्यमंत्री योगी म्हणाले, आम्ही कोरोनाच्या तिसऱ्यालाटेच्या दृष्टीनेही तयारी सुरू केली आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बोलले जात आहे, की ही लाट मुलांना अधिक प्रभावित करेल. यामुळे मुलांची चार गटांत विभाजन करून देखरेख समित्या सक्रिय झाल्या आहेत. तसेच वृद्धांच्या लसीकरणालाही गती देण्यात आली आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूक