शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
2
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
3
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
4
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
5
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
7
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
8
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
9
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
11
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
12
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
13
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
14
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
15
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
16
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
17
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
18
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
19
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
20
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."

गोतस्करी आणि गुंडगिरी पश्चिम बंगालमधून हद्दपार करणार: योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 4:58 PM

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Election 2021) तारखा जाहीर करण्यात आल्यानंतर आता राजकीय रणधुमाळीला आता वेग येऊ लागला आहे. तृणमूल काँग्रेसचे सरकार खालसा करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कंबर कसून तयारीला लागला आहे. यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी पश्चिम बंगालमधील मालया येथे एका सभेला संबोधित केले.

ठळक मुद्देयोगी आदित्यनाथ यांची मालदा येथे जनसभातृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी सरकारवर टीकास्त्र'सीएए'संदर्भात प्रायोजित हिंसाचार असल्याचा आरोप

मालदा :पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Election 2021) तारखा जाहीर करण्यात आल्यानंतर आता राजकीय रणधुमाळीला आता वेग येऊ लागला आहे. तृणमूल काँग्रेसचे सरकार खालसा करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कंबर कसून तयारीला लागला आहे. यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी पश्चिम बंगालमधील मालया येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी गो-तस्करी, जय श्रीराम घोषणा, तृणमूलची गुंडगिरी, CAA अशा अनेक मुद्द्यांवरून ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. (yogi adityanath criticised mamata banerjee and trinamool congress at malda)

पश्चिम बंगालमध्ये जय श्रीरामाच्या घोषणा देण्यावरही बंदी घातली जात आहे. प्रभू श्रीरामांच्या घोषणेलाही बंदी घालणाऱ्या रामद्रोह्यांचे आता पश्चिम बंगालमध्ये काहीही काम राहिलेले नाही. बंगालमधील जनता शक्तीपूजक आहे. मात्र, दुर्गा पूजनावरही येथे बंदी घातली जाते. ईदच्या निमित्ताने गोहत्या केली जाते, अशी टीका करत भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यावर या सर्व गोष्टी बंद होतील, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.

नाना पटोले यांनी सांगितला GDP चा नेमका अर्थ; मोदी सरकारवर केली टीका

'सीएए'संदर्भात प्रायोजित हिंसाचार  

CAA वरूनही योगी आदित्यनाथ यांनी ममता बॅनर्जी सरकारवर टीका केली. 'सीएए'प्रकरणावर पश्चिम बंगालमध्ये झालेला हिंसाचार हा प्रायोजित होता, असा आरोप करत पश्चिम बंगालमध्ये लव्ह जिहाद प्रकरणी सरकारकडून काहीच कारवाई केली जात असल्याचा दावाही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी बोलताना केला. 

तृणमूलच्या गुंडांना हद्दपार करणार

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या गुंडांकडून ज्येष्ठ नागरिकांना मारहाण केली जाते. भाजपच्या कार्यकर्त्यांचीही हत्या करण्यात येतात. मात्र, ममता सरकारने त्याविरोधात काही कारवाई केली नाही. पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन होईल आणि २ मेनंतर तृणमूल काँग्रेसचे गुंड भीक मागत फिरताना दिसतील, असे निशाणा योगी आदित्यनाथ यांनी साधला. 

दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून, आठ टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. आठही टप्प्यांचे मतदान पूर्ण झाल्यावर २ मे रोजी मतमोजणी होईल. पश्चिम बंगालसह, आसाम, पुदुच्चेरी, तामिळनाडू, केरळ या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्याक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अलीकडेच जाहीर करण्यात आला.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाwest bengalपश्चिम बंगाल