उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूने ते सभांना संबोधित करत आहेत. सध्या मुख्यमंत्री योगी मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात निवडणूक सभा घेत आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी सांगितलं की, मध्य प्रदेशात पुन्हा एकदा डबल इंजिनचे सरकार स्थापन होणार आहे.
"वाईट पद्धतीने काँग्रेसचा पराभव होतोय"
योगी आदित्यनाथ यांनी अजयगड, पन्ना येथे आयोजित जाहीर सभेत "राहुल गांधी केदारनाथच्या दौऱ्यावर गेल्याचं चित्र पाहून मला समाधान वाटलं. विधानसभेच्या सेमी फायनलमध्ये काँग्रेसचा पराभव होत असल्याची त्यांना आधीच खात्री आहे. म्हणूनच ते मैदान सोडून पळून गेले आहेत" असं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेसच्या काळात उत्तराखंडमध्ये एक शोकांतिका झाली होती. केदारनाथ पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. काँग्रेस सरकारच्या काळात अनेक दिवस लोक चिंतेत होते, पण काँग्रेसने कोणाचीच दखल घेतली नाही. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारला सेवेची संधी देण्याची मागणी केली होती, पण तसं झाले नाही. नरेंद्र मोदींना संधी मिळताच उत्तराखंड आणि केंद्र सरकारने मिळून केदारनाथला भव्य स्वरूप दिलं आहे.
"अडचणीच्या काळात केदारनाथमध्ये प्रार्थना करताहेत"
राहुल गांधींच्या केदारनाथ दौऱ्याची खिल्ली उडवत योगी म्हणाले की, संकटकाळात राहुल गांधी केदारनाथला गेले हे चांगलं झाले. काँग्रेसचा पराभव होत आहे, त्यामुळेच अडचणीच्या काळात राहुल गांधी केदारनाथमध्ये राहून प्रार्थना करत आहेत. काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करताना मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेस प्रत्येक गरिबांना रेशन सुविधा देऊनही हे करू शकली असती. पण तसं केलं नाही. राज्यात दीर्घकाळ काँग्रेसची सत्ता होती. मात्र डबल इंजिनच्या भाजपा सरकारने हे सर्व केलं. काँग्रेसला समस्या म्हणत योगी म्हणाले की, दहशतवाद हे काँग्रेसचे योगदान आहे. फरक स्पष्ट आहे, एक समस्या आहे आणि दुसरा उपाय आहे.