शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

'थोडा धीर धरा, राम मंदिर नक्कीच होणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 8:26 PM

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा संतांशी संवाद

अयोध्‍या : थोडे दिवस धीर धरा, अयोध्येत राम मंदिर नक्की होईल, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. महंत नृत्यगोपाल दास यांच्या जन्मदिनानिमित्त अयोध्येत संत संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना आदित्यनाथ यांनी संत समुदायाला धीर बाळगण्याचं आवाहन केलं. काही दिवस संयम बाळगा. प्रभू रामाची कृपा झाल्यावर राम मंदिराची उभारणी होईल, असं आदित्यनाथ यांनी म्हटलं. राम मंदिराचा प्रश्न नक्की सुटेल. संत समुदायानं थोडा संयम बाळगावा, असं योगी आदित्यनाथ संतांशी संवाद साधताना म्हणाले. 'जे लोक राम जन्मभूमी आंदोलनाला विरोध करायचे, त्यांच्या तोंडून आता मंदिराचा विषय निघतो. हा एक कट असू शकतो. त्यामुळे आपण सतर्क राहायला हवं,' असं आदित्यनाथ यांनी म्हटलं. 'राम मंदिराच्या उभारणीबद्दल कोणीही मनात शंका बाळगू नये. आपल्याला घटनेच्या मर्यादेत राहून मंदिर बांधायचं आहे. त्यामुळे संतांनी थोडं धीरानं घ्यावं,' असं योगी म्हणाले. संतांशी संवाद साधताना योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 'आज राम मंदिराबद्दल बोलणाऱ्या लोकांनी कधीकाळी रामभक्तांवर गोळ्या झाडल्या होत्या,' अशा शब्दांमध्ये त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. गेल्या 15 वर्षांमध्ये किती मुख्यमंत्री अयोध्येत आले, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला. गेल्या सरकारांनी अयोध्येच्या विकासासाठी काहीही केलं नाही, असं योगी म्हणाले. आपलं सरकार राम जन्मभूमीच्या विकासासाठी शक्य तितके सर्व प्रयत्न करेल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरyogi adityanathयोगी आदित्यनाथAyodhyaअयोध्याBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश