लखनऊ : उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या शपथविधीची तयारी पूर्ण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी उत्तर प्रदेशमध्ये 3-4 उपमुख्यमंत्री (Deputy CM)बनवले जाऊ शकतात. याशिवाय 55-60 मंत्री केले जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर सदर मतदारसंघातून आमदार झाले असून आज (मंगळवार) त्यांनी उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारमध्ये यावेळी 3-4 उपमुख्यमंत्री बनवले जाऊ शकतात. केशव प्रसाद मौर्य, डॉ दिनेश शर्मा, बेबी राणी मौर्य, असीम अरुण आणि ब्रिजेश पाठक यांची नावे उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत पुढे आहेत.
याशिवाय 24 मार्चला मंत्र्यांची यादी निश्चित केली जाऊ शकते. विशेष म्हणजे, यावेळी उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केले जाणार आहेत. अपना दल (एस) आणि निषाद पार्टीच्या कोट्यातून देखील मंत्री होणार आहेत. दिल्लीत मंत्रिमंडळासाठी नावांची चर्चा सुरू आहे. मंत्रिमंडळासाठी 132 नावांची चर्चा सुरू आहे.
संभाव्य मंत्र्यांची नावेब्रिजेश पाठक, आशुतोष टंडन, राजेश्वर सिंह, मोहसिन रझा, नितीन अग्रवाल, रामचंद्र यादव, रमापती शास्त्री, सुरेश पासी, राकेश गुरु, लोकेंद्र सिंह आणि आशा मौर्य यांना उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री केले जाऊ शकते.
जिल्हानिहाय जाणून घ्या कोण होऊ शकतो मंत्री?गोरखपूरमधून राजेश त्रिपाठी आणि श्री राम चौहान, कुशीनगरमधून पीएन पाठक आणि सुरेंद्र कुशवाह, देवरियामधून जयप्रकाश निषाद, सूर्य प्रताप शाही आणि सुरेंद्र चौरसिया, महाराजगंजमधून ज्ञानेंद्र सिंग आणि प्रेमसागर पटेल, बस्तीमधून अजय सिंह, सिद्धार्थनगरमधून राजा जयप्रताप सिंग, बलियामधून दयाशंकर सिंह, प्रयागराजमधून केशव प्रसाद मौर्य, नंद गोपाल नंदी, सिद्धार्थनाथ सिंह आणि प्रवीण पटेल, प्रतापगडमधून राजेंद्र मौर्य आणि महेंद्र सिंह यांना मंत्री बनवण्याचा विचार केला जात आहे.
याशिवाय, जौनपूरमधून गिरीश यादव, मऊमधून रामविलास चौहान, वाराणसीतून अनिल राजभर, रवींद्र जैस्वाल आणि नीळकंठ तिवारी, सोनभद्रमधून भूपेश चौबे आणि संजय गौर, मिर्झापूरमधून रमाशंकर पटेल किंवा अनुराग सिंह पटेल, सीतापूरमधून राकेश गुरू आणि आशा मौर्य, शहाजहानपूर सुरेश खन्ना आणि जितिन प्रसाद, हरदोईमधून नितीन अग्रवाल, रजनी तिवारी, शशांक वर्मा आणि लोकेंद्र सिंह, गोंडातून रमापती शास्त्री आणि अयोध्येतून रामचंद्र यादव यांना मंत्री केले जाऊ शकते.
अमेठीमधून सुरेश पासी, लखनऊमधून राजेश्वर सिंग, ब्रिजेश पाठक, आशुतोष टंडन आणि मोहसीन रझा, कानपूरमधून सतीश महाना आणि नीलिमा कटियार, बुंदेलखंडमधून स्वतंत्र देव सिंग, रामरतन कुशवाह आणि प्रकाश द्विवेदी किंवा रवी शर्मा, कन्नौजमधून असीम अरुण, इटावामधून सरिता भदौरिया, मैनपुरीतील रामनरेश अग्निहोत्री, अलिगढमधून जयवीर सिंह, संदीप सिंह लोधी आणि अनिल पराशर, मथुरामधून श्रीकांत शर्मा आणि लक्ष्मी नारायण चौधरी, आग्रामधून जीएस धर्मेश आणि बेबी राणी मौर्य, हाथरसमधून अंजुला माहूर, राजीव सिंग आणि महेश गुप्ता, बरेलीमधून संजीव अग्रवाल आणि धरमपाल सिंह यांना मंत्री केले जाण्याची शक्यता आहे.
याचबरोबर, बुलंदशहरमधील संजय शर्मा किंवा अनिल शर्मा, गाझियाबाद-नोएडातून अतुल गर्ग, सुनील शर्मा आणि नंदकिशोर गुर्जर किंवा तेजपाल नगर, सहारनपूरमधून ब्रिजेश सिंह, मुकेश चौधरी, जसवंत सैनी किंवा कोणी इतर सैनी, मेरठमधून अमित अग्रवाल, दिनेश खाटीक, सोमेंद्र तोमर, मुझफ्फरनगरमधून कपिलदेव अग्रवाल, बागपतमधून केपी मलिक आणि मुरादाबादमधून चौधरी भूपेंद्र सिंह यांना मंत्री केले जाऊ शकते.