नवी दिल्ली - उत्तर प्रदेश निवडणुकांची घोषणा होताच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये, उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला उमेदवारी दिली आहे. आता, भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून 57 ते 58 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अयोध्येतून तिकीट न देता गोरखपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाकडून आपल्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीय. या निवडणुकीत 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यात उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईलाही तिकीट देण्यात आल्याची माहिती, उत्तरप्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी दिली आहे. आता, भाजपने 58 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजप नेते आणि मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत माहिती दिली. दुसऱ्या टप्प्यात 38 ते 55 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, असे प्रधान यांनी सांगितले.
भाजप उमेदवारांची पहिली यादी
योगी आदित्यनाथ- गोरखपुर शहरकेशव प्रसाद मौर्य- प्रयागराज सिराथू(251 नंबर विधानसभा)कैराना- श्रीमती मृगांका सिंहथानागांव- सुरेश राणाशामली- तेजेंद्र सिंह नरवालबुढ़ाना- उमेश मलिकचरथावल- सपना कश्यपमुजफ्फरनगर- कपिल देव अग्रवालखतौली- विक्रम सैनीमीरापुर- प्रशांत गुर्जरसरधना- संगीत सोमहस्तिनापुर- दिनेश खटिकमेरठ कैंट- अमित अग्रवालकिठोर- सत्यवीर त्यागीमेरठ- कमल दत्त शर्मामेरठ साउथ- सुरेंद्र तोमरछपरौली- सहेंद्र सिंह रमालाबड़ौत- कृष्णपाल मलिकबागपत- योगेश धामालोनी- नंद किशोर गुर्जरमुरादनगर- अजित पाल त्यागीसाहिबाबाद- सुनील शर्मागाजियाबाद- अतुल गर्गमोदीनगर- मंजू सिवाचधौलाना- धर्मेश तोमरहापुड़- विजय पालगढ़मुक्तेश्वर- हरेंद्र चौधरी तेवतियानोएडा- पंकज सिंहजेवर- धीरेंद्र सिंहशिकारपुर- अनिल शर्मासिंकदराबाद- लक्ष्मी राज सिंहबुलंदशहर- प्रदीप चौधरीअनूपशहर- संजय शर्मास्याना- देवेंद्र सिंह लोधीडिबाई- चंद्र पाल सिंहखुर्जा- मीनाक्षी सिंहमांट- राजेश चौधरीगोवर्धन- ठाकुर मेघश्याम सिंहबटेर- पूरन प्रकाशएत्मादपुर- डॉ. धर्मपाल सिंहआगरा कैंट- जीएस धर्मेशआगरा दक्षिण- योगेंद्र उपाध्यायआगरा उत्तरी- पुरुषोत्तम खंडेलवालआगरा देहात- बेबी रानी मौर्यफतेहपुर सीकरी- चौधरी बाबूलालखैरागढ़- भगवान सिंह कुशवाहा
दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची यादी
बेहट- नरेश सैनीसहारनपुर नगर- राजीव गुंबरसहारनपुर- जगपाल सिंहदेवबंद- बृजेश सिंह रावतरामपुर मनिहारन- देवेंद्रगंगोह- श्री कीरत सिंह गुर्जरनगीना- डॉ. यशवंतबरहाकोट- सुकांत सिंहनरहौट- ओमकुमारबिजनौर- शुचि मौसम चौधरीचांदपुर- कमलेश सैनीनोहपुर- सीपी सिंहकांठ- राजेश कुमार चुन्नूमुरादाबाद नगर- रितेश गुप्ताकुंदरकी- कमल प्रतापतिचंदौसी- गुलाबो देवीअसमौली- हरेंद्र सिंह रिंकूसंभल- राजेश सिंहलचमरौआ- मोहन कुमार लोधीरामपुर - आकाश सक्सेनामिलट- राजबालाधनौरा- राजीव सरारानौगांव- देवेंद्र नागपालहसनपुर- महेंद्र सिंह खडगवंशीबिसौली- कुशाग्र सागरबिल्सी- हरीश शाक्यबदायूं- महेश गुप्ताशेखपुर- धर्मेंद्र शाक्यनीलगंज- डॉ. डीसी वर्माफरीदपुर- श्याम बिहारी लालबरेली- डॉ. अरुन सक्सेनाबरेली कैंट- संजीव अग्रवालआंवला- धर्मपाल सिंहकटरा- वीर विक्रम सिंहवाया- चेत राम पासीशाहजहांपुर- सुरेश खन्ना
मतदान आणि मतमोजणी कधी?उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडणार आहे. येत्या 10 फेब्रुवारीपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. 10 फेब्रुवारी (पहिला टप्पा), 14 फेब्रुवारी (दुसरा टप्पा), 20 फेब्रुवारी (तिसरा टप्पा), 23 फेब्रुवारी (चौथा टप्पा), 27 फेब्रुवारी (पाचवा टप्पा), 3 मार्च (सहावा टप्पा) आणि 7 मार्चला सातवा टप्पासाठी निवडणूक होणार आहे. तर, 10 मार्चला मतमोजणी होणार आहे.