गाझीपूर:उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने एका महसूल अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध अवमानकारक टिपण्णी केल्याचा आरोप या अधिकाऱ्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी केलेल्या तपासानंतर या अधिकाऱ्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती तहसील उपजिल्हाधिकारी सूरज यादव यांनी दिली आहे. (yogi government suspended ghazipur revenue officer for derogatory remarks on pm narendra modi)
जखानिया येथील तहसील उपजिल्हाधिकारी सूरज यादव यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, ओडराई गावात कर्तव्यावर असलेले महसूल अधिकारी जितेंद्र नाथ सिंह यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या विरोधात अवमानकारक टिप्पणी केली असून, त्यांची ही कृती सरकारी सेवा नियमावलींचे उल्लंघन करणारी आहे. यासंदर्भात तक्रार मिळाल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यात आला.
मायावतींचं ठरलं! AIMIM शी आघाडी नाही; उत्तर प्रदेश, उत्तराखंडच्या निवडणुका स्वबळावर
तपासात दोषी आढळल्याने केली कारवाई
पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात अवमानकारक टिप्पणी केल्याची तक्रार मिळाल्यानंतर केलेल्या तपासात जितेंद्र नाथ सिंह यांच्यावरील आरोप खरे असल्याचे आढळून आले. तसेच सरकारी सेवा नियमांचे पालन न केल्याबाबतही ते दोषी आढळले. यामुळे जितेंद्र नाथ सिंह यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली, अशी माहिती यादव यांनी दिली. निलंबित महसूल अधिकारी महू जिल्ह्यातील सरसेना गावातील रहिवासी आहे.
“जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवले गेले हे चांगलेच झाले, पण...”: राकेश टिकैत
दरम्यान, यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध अवमानकारक टिप्पणी केल्याबाबत मध्य प्रदेशमधील सहसंचालक स्तरावरील अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली होती. या अधिकाऱ्याने सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींची चेष्टा करणारी पोस्ट शेअर केली होती. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. वाद वाढल्यानंतर या अधिकाऱ्याने ती पोस्ट डिलीट केली होती. मात्र, राज्य सरकारने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या अधिकाऱ्याचे निलंबन केले होते.