लखनऊ, दि. 18- उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार राज्यातील मदरशांसाठी एक वेगळी वेबसाइट लॉन्च करते आहे. उत्तरप्रदेशचे अल्पसंख्यांक मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी शुक्रवारी विधानभवनाच्या तिलक हॉलमध्ये या नव्या वेबपोर्टलचं उद्धाटन करणार आहेत.
उत्तर प्रदेशात पहिल्यांदा मदरशांसाठी या पद्धतीचं वेबपोर्टल बनविण्यात आलं आहे. सरकारी अनुदान मिळणाऱ्या राज्यातील एकुण 560 मदरशांना तसंच 10 हजार पेक्षा जास्त मान्यता प्राप्त मदरशांना त्यांची संपूर्ण माहिती या वेबपोर्टलवर द्यावी लागणार आहे. राज्यातील सगळ्या मदरशांना या वेबपोर्टलवर मदरशाची इमारत, वर्गांची माहिती आणि फोटो तसंच शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची माहिती द्यावी लागणार आहे.
आणखी वाचा
लाउडस्पीकर बंदी घालायची असेल तर सर्व धार्मिक स्थळांवर सुद्धा घालावी लागेल - योगी आदित्यनाथ
रस्त्यावर नमाज रोखू शकत नाही तर, पोलीस स्थानकात जन्माष्टमी कशी थांबवू - योगी आदित्यनाथ
योगी सरकारने सुरू केलेल्या या नव्या वेबपोर्टलमुळे मदरशांमधील शिक्षण व्यवस्था सुधारायला आणि तेथील व्यवस्था पारदर्शी करायला मदत होइल, असं उत्तर प्रदेश मदरसा काऊन्सिलचं मत आहे. हे नवं वेबपोर्टल सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार, विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती या सगळ्या गोष्टी ऑनलाइन केल्या जाणार आहेत.
रस्त्यावर नमाज रोखू शकत नाही तर, पोलीस स्थानकात जन्माष्टमी कशी थांबवू - योगी आदित्यनाथईदच्या वेळी रस्त्यावर नमाज अदा करण्यापासून मला रोखता येत नसेल तर, पोलीस स्थानकातही जन्माष्टमी साजरी करण्यापासून मी कोणाला रोखू शकत नाही असं वक्तव्य उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं. आधीच्या समाजवादी पार्टीच्या सरकारला टोला लगावताना स्वत:ला यदुवंशी म्हणवणा-यांनी पोलीस स्थानकात जन्माष्टमी साजरी करण्यावर बंदी घातली होती असे ते म्हणाले.प्रेरणा जनसंचारने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसांबळेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. आपल्या भाषणात आदित्यनाथांनी कावड यात्रेचाही संदर्भ दिला. अधिका-यांनी जेव्हा मला कावड यात्रेमध्ये माईक, डीजे आणि म्युझिक सिस्टीम वापरण्याला मनाई केल्याचे सांगितले. त्यावेळी मी त्यांना सर्वच ठिकाणी माईकवर बंदी घालता येऊ शकते का? कुठल्याही धर्मस्थळामधून माईकाचा आवाज बाहेर येणार नाही हे सुनिश्चित करता येईल का? असा प्रतिप्रश्न केला. जर अशा प्रकारे आपल्याला बंदीची अंमलबजावणी करता येत नसेल तर, यात्रा नेहमीसारखी चालू राहिल असे मी त्यांना सांगितले