एकीकडे मध्य प्रदेशमध्ये केंद्रीय मंत्र्यांना विधानसभेचे तिकीट देत भाजपाने राजकारणात खळबळ उडवून दिली असताना आता उत्तर प्रदेशातून मोठी बातमी येत आहे. लोकसभा निवडणुकीत योगी सरकारमधील मंत्र्यांना भाजपकडून लॉटरी लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विरोधकांची इंडिया आघाडी पाहता भाजपाने व्य़ूहरचनेत मोठा बदल केला आहे. मध्ये प्रदेशमध्ये तीन केंद्रीय मंत्र्यांसह सात खासदारांना विधानसभेचे तिकीट देण्यात आले आहे. युपीमध्ये इंडिया आघाडी खेळ करण्याची शक्यता असल्याने राज्यात प्रचलित असलेल्या मंत्र्यांना लोकसभेचे तिकीट देण्यात येणार आहे.
योगी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे. जितिन प्रसाद यांनाही भाजपा लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची तयारी करत आहे. योगींचे आणखी एक मंत्री राकेश सचान यांना देखील लढविण्याचा विचार केला जात आहे. नरेंद्र कश्यप यांना देखील लोकसभेला उतरविण्याची तयारी करण्यात येत आहे.
याच लिस्टमध्ये दया शंकर मिश्रा, संजय गंगवार, आग्रा ग्रामीणच्या आमदार बेबी राणी मौर्य, बलियाचे आमदार दयाशंकर सिंह आणि पाथरदेवाचे आमदार सूर्य प्रताप शाही, मथुराचे आमदार श्रीकांत शर्मा, 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले आरपीएन सिंह यांना 2024 मध्ये लोकसभेचे उमेदवार बनवण्याचा विचार करत आहेत.