शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

Sudhanshu Trivedi Reaction: जो शब्द बोललोच नाही, त्याबाबत तुम्ही वाद घालताय; सुधांशू त्रिवेदींची शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावर प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 11:18 PM

अहमदाबादमध्ये पत्रकारपरिषद घेत शिवाजी महाराजांबाबतची त्रिवेदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

राजकारणात एक गोष्ट असते, काय बोललो गेले यापेक्षा जास्त महत्वाचे आहे कोण बोलले आहे. मी एक गोष्ट सांगू इच्छितो, हिंदू, हिंदू धर्म आणि हिंदुत्वात आणि भारतीय इतिहासात हिंदुत्वाच्या सर्वात मोठ्या महानायकांपैकी एक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माझ्या मनात अवमानना आहे, असं कोणाला वाटत असेल तर त्याने स्वत:च्या बुद्धीबाबत विचार करावा, अशी टीका भाजपाच्या सुधांशू त्रिवेदी यांनी केली आहे. 

अहमदाबादमध्ये पत्रकारपरिषद घेत शिवाजी महाराजांबाबतची त्रिवेदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जे लोक बोलत आहेत, हे लोक शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला मानतात का? हिंदवी स्वराज्य बनविण्याची शपथ घेतली त्याला मानता? यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या साम्राज्य़ाचे नाव हिंदूपतपातशाही होते, तुम्ही मानता? नाही मानत, अशा शब्दांत भाजपाच्या सुधांशु त्रिवेदींनी विरोधकांवर प्रश्न उपस्थित केले. 

 जो शब्द बोललाच नाही गेला, त्याबाबत तुम्ही वाद घालत आहात. लुटीयन्स दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने किती रस्ते आहेत. औरंगजेबाच्या संपूर्ण परिवाराच्या नावांवर रस्त्यांची नावे आहेत. बाबर रोड, हुमायू रोड, अकबर रोड, शाहजहा रोड, औरंगजेब रोड, तुम्ही दगडावर काय लिहिलं आणि पुस्तकांमध्ये औरंगजेबाची प्रशंसा व महानता लिहिली, अशी टीका त्रिवेदी यांनी केली.  

सुधांशू त्रिवेदी काय म्हणालेले?राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानानंतर एका वृत्तवाहिनीवर सुधांशू त्रिवेदी भाजपची बाजू मांडत होते. यातल्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला. 'सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली, असं सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला. पण त्याकाळात अनेक जण प्रस्तावित फॉरमॅटमध्येच बाहेर निघण्यासाठी ब्रिटीशांना पत्र लिहायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबाला पाचवेळा पत्र लिहिली, याचा अर्थ काय झाला?,' असं वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी केलं होतं.

टॅग्स :BJPभाजपाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज