नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी पाठविलेल्या पत्रात तुम्ही मला वडिलांसमान आहात, माझे प्रेरणास्रोत आहात, असे म्हटले आहे. प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधानानांनी पाठविलेले पत्र टिष्ट्वटरवर शेअर केले आहे.मी दिल्लीत नवा होतो. मला केवळ एका राज्याच्या कारभाराचा अनुभव होता. अशा काळात तुम्ही मला मार्गदर्शन केले, आपल्यातील राजकीय मतभेद कधीही संबंधांच्या आड येऊ दिले नाहीत, तुमच्याकडे मोठा राजकीय, आर्थिक, वैश्विक अनुभव असल्याचा फायदा मला आणि माझ्या सरकारला अनेकदा झाला, असे मोदी यांनी पत्रात नमूद केले आहे. पंतप्रधानांचे हे पत्र मनाला भावणारे आहे, असे प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे. तुमच्या साध्या फोननेही मला ऊर्जा, उत्साह मिळत असे. तुम्ही मला कायम स्नेही म्हणून वागवले, माझी काळजी तुम्ही घेतली, याचा उल्लेख करून पंतप्रधान मोदी यांनी पत्रात त्यांचे आभार मानले आहेत.
तुम्ही माझे प्रेरणास्रोत, मोदींनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना लिहिलेल्या पत्रात मानले आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 1:02 AM