'पीएम मोदींना भेटताना तुम्ही त्यांच्यासमोर झुकलात', राहुल गांधींच्या टीकेवर ओम बिर्लांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 05:21 PM2024-07-01T17:21:26+5:302024-07-01T17:22:47+5:30
"या सभागृहात अध्यक्षांपेक्षा कोणीही मोठा नाही..."
Parliament Session : संसदेच्या विशेष अधिवेशनात बोलताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज(दि.1 जुलै) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर बोचरी टीका केली. "ओम बिर्ला मला भेटले, तेव्हा त्यांनी सरळ उभे राहून हस्तांदोलन केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटताना वाकून हस्तांदोलन केले," अशी टीका राहुल गांधी यांनी केली. आता या टीकेला खुद्द ओम बिर्ला यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान
ओम बिर्ला काय म्हणाले ?
राहुल गांधींच्या टीकेला उत्तर देताना ओम बिर्ला म्हणतात, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभागृहाचे नेते आहेत. माझी संस्कृती, मूल्ये हे सांगतात की, वैयक्तिक जीवनात, सार्वजनिक जीवनात आणि या आसनावरही, जे आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांना वाकून नमस्कार करा आणि आवश्यक असल्यास त्यांच्या पायाला स्पर्श करा आणि सारख्याच वयाचे आहेत, त्यांना सारखीच वागणूक दिली पाहिजे," अशी प्रतिक्रिया बिर्ला यांनी दिली.
'संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे गंभीर बाब', राहुल गांधींच्या वक्तव्यावर PM मोदींचा पलटवार
राहुल गांधींचे पुन्हा प्रत्युत्तर
लोकसभा अध्यक्षांच्या उत्तरानंतर राहुल गांधी उभे राहिले आणि त्यांनी अध्यक्षांचे म्हणने आदराने मान्य करत असल्याचे सांगितले. तसेच, "या सभागृहात अध्यक्षांपेक्षा कोणीही मोठा नाही. अध्यक्ष हा सर्वात मोठा आहे आणि आपण सर्वांनी अध्यक्षांसमोर नतमस्तक झाले पाहिजे. मी नतमस्तक होईल आणि संपूर्ण विरोधकही तुमच्यापुढे झुकतील. ही लोकशाही आहे आणि तुम्ही या सभागृहाचे संरक्षक आहात. त्यामुळेच, तुम्ही कोणाच्याही समोर झुकू नका आणि सर्वांना समानतेने वागवा," असे राहुल गांधी म्हणाले.