शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

महाराष्ट्रात सत्तेत सामील करताना तुमचे हे आरोप कुठे गेले?; सुप्रिया सुळे भाजपावर कडाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 11:25 AM

आज चार वर्षे झाली तरीही तेथे निवडणूका घेतल्या नसून तेथे लोकनिर्वाचित सरकार अस्तित्वात नाही याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

भाजपा जाणिवपूर्वक घराणेशाहीचा उल्लेख करीत असते. पण जेव्हा एनडीएची बैठक असते तेव्हा घराणेशाहीचे प्रोडक्ट असणारे अनेक नेते त्या बैठकीला उपस्थित राहतात, हे तुम्ही लपवू शकणार नाही, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या भाषणात केली.  मी स्वतः घराणेशाहीची प्रोडक्ट असले तरी प्रतिभा-शरद पवार यांची मी मुलगी आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे, असेही सुप्रिया सुळेंनी सभागृहात सांगितले. 

आम आदमी पक्षाने आमच्यावर एकेकाळी आमच्यावर टीका केली होती. हे मान्य, पण माझ्या मतदारसंघात येऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर नॅचरली करप्ट पार्टी अशी टिका भाजपाच्या नेत्यांनी केली. मात्र आता महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सत्तेत सोबत घेताना हे आरोप कुठे गेले?, असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. तसेच या आरोपांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भाजपाने माफी मागितली पाहिजे अशी ठाम भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

लोकसभेत नॅशनल कॅपिटल टेरीटरी ऑफ दिल्ली (सुधारणा) विधेयक २०२३ मांडण्यात आले. या विधेयकाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठामपणे विरोध केला. यावेळी बोलताना हे विधेयक असंवैधानिक, लोकशाहीविरोधी आणि सहकारी संघराज्यवादाच्या विरोधात असल्याची भूमिका मांडली. भारतासारख्या मोठ्या लोकशाहीत केंद्राचे नियंत्रण हा योग्य शब्द नसल्याचे नमूद केले. भाजपाच्या वतीने हा शब्द वापरला गेला त्याचा विरोध केला. भाजपाने दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन आपल्या प्रत्येक निवडणूक जाहिरनाम्यात दिले, ही वस्तुस्थिती असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितले.

‌एकिकडे दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन द्यायचे आणि दुसरीकडे  तिथली सत्ता आपल्या हातात नाही म्हणून दिल्लीच्या लोकनिर्वाचित सरकारवर आपले नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी विधेयक आणायचे ही दुतोंडी भूमिका आहे. एकतर भाजपा निवडणूक जाहिरनाम्यात खोटे बोलते किंवा आता लोकशाहीच्या मंदिरात खोटे बोलत आहे, याचे उत्तर त्यांना दिल्लीच्या जनतेला द्यावे लागेल असे सुप्रिया सुळेंनी नमूद केले. जम्मू काश्मीर या संपूर्ण राज्याचे त्रिभाजन करताना तेथे वर्षभरात निवडणूक घेऊ असा विश्वास संसदेला देण्यात आला होता. परंतु आज चार वर्षे झाली तरीही तेथे निवडणूका घेतल्या नसून तेथे लोकनिर्वाचित सरकार अस्तित्वात नाही याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

भाजपा दुहेरी भूमिका काय घेतंय?

नैतिकता हा भाजपाच्या नेत्यांचा आवडता शब्द आहे. देशातील जनतेने दोन वेळा त्यांना बहुमत देऊन जनादेश दिला असा त्यांचा दावा देखील आहे. मग हाच न्याय आम आदमी पक्षाला का लागू होत नाही हा सवाल उपस्थित केला. दिल्ली आणि पंजाब या दोन्ही ठिकाणी त्यांना स्पष्ट जनादेश आहे. पण तरीही हे विधेयक आणले जाते ही दुहेरी भूमिका भाजपा का घेत आहे? भाजपाच्या प्रमुख वक्त्यांनी नमूद केल्याप्रमाणे ही निवडणूक प्रक्रियेतील हेराफेरी नाही का असा प्रश्न विचारला. सचिवांना जर चुकीची वागणूक मिळाली असेल तर ती निश्चितच चुकीची आहे. मग ती दिल्ली असो किंवा महाराष्ट्र. पण दोन्हीकडे तुम्हाला समान न्याय द्यावा लागेल, असं सुप्रिया सुळेंनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाlok sabhaलोकसभाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार