आपच्या नव्या मंत्रिमंडळात मिळू शकते जुन्यांना डच्चू
By admin | Published: February 11, 2015 11:19 PM
नवी दिल्ली : भाजपा आणि काँग्रेसचे पानिपत करीत ऐतिहासिक विजय मिळविणाऱ्या आम आदमी पार्टीने (आप) दिल्लीत सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे़ आप सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात तीन माजी मंत्र्यांना डच्चू देत, त्यांच्या जागी नव्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे़ आपचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांना पूर्वीपेक्षा महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली जाण्याचीही शक्यता आहे़
नवी दिल्ली : भाजपा आणि काँग्रेसचे पानिपत करीत ऐतिहासिक विजय मिळविणाऱ्या आम आदमी पार्टीने (आप) दिल्लीत सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे़ आप सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात तीन माजी मंत्र्यांना डच्चू देत, त्यांच्या जागी नव्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे़ आपचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांना पूर्वीपेक्षा महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली जाण्याचीही शक्यता आहे़पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने आज बुधवारी याबाबतचे संकेत दिले़ सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची अपेक्षा आहे़ मात्र यापूर्वी ४५ दिवसांच्या केजरीवाल सरकारमध्ये मंत्री राहिलेले गिरीश सोनी, सोमनाथ भारती आणि राखी बिडलान यांना मात्र यावेळी मंत्रिपद हुलकावणी देण्याची शक्यता आहे़ मनीष सिसोदिया यांना याउलट पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण खाते मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे़ तूर्तास नव्या मंत्रिमंडळातील रूपरेषेवर औपचारिक निर्णय झालेला नाही़ उद्या गुरुवारी या संदर्भातील बैठक अपेक्षित आहे़काल मंगळवारीपासून केजरीवाल यांची प्रकृती बरी नाही़ त्यामुळे पक्षाच्या विजयोत्सवानंतर लगेच ते आपल्या निवासस्थानी परतले होते़ नायब राज्यपालांना भेटल्यानंतर त्यांचा घशाचा त्रास वाढला होता़ कुमार विश्वास यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमालाही त्यांनी फार कमी वेळासाठी हजेरी लावली होती़ आज बुधवारी अंगात ताप असूनही राष्ट्रपती आणि केंद्रीय मंत्र्यांच्या भेटायसाठी ते पोहोचले़ त्यामुळेच तूर्तास तरी नव्या मंत्रिमंडळाच्या मुद्यावर औपचारिक चर्चा झालेली नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले़बॉक्समाजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू आदर्श शास्त्री यांना केजरीवालांच्या नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते़ ॲपल कंपनीतील त्यांचा अनुभव आणि त्यांच्या ज्ञानाचा लाभ पक्षासह जनतेला मिळवून देण्याचा केजरीवाल यांचा विचार आहे़ चांदणी चौकातून विधानसभेवर गेलेल्या अल्का लांबा यांचीही नव्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे़