Padma awards 2021: नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी देशाच्या नागरिकांना खास आवाहन केले आहे. आपल्याला माहिती असलेल्या अशा लोकांची नावे सुचवा जे तळागाळात जाऊन असमान्य काम करत आहेत. भारतात ग्राऊंड लेव्हलवर अनेक लोक असे आहेत, जे लोकांसाठी समाजासाठी काम करतात. मात्र, अनेकांना याची माहिती नसते, असे त्यांनी ट्विट केले आहे. (Nominate your choice of inspiring people for Padma awards: PM Modi)
मोदींनी पुरस्कारासाठी एका वेबसाईटची लिंक शेअर केली आहे. भारतात अनेक प्रतिभावान लोक आहेत, जे तळागाळात राहून असामान्य काम करत आहेत. त्या लोकांबाबत आपल्याला पहायला किंवा ऐकायला मिळत नाही. तुम्ही अशा प्रेरणादायी लोकांना ओळखता का? तुम्ही अशा लोकांची नावे पद्म पुरस्कारासाठी सुचवू शकता. यासाठी 15 सप्टेंबरपर्यंतची वेळ आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.
पद्म पुरस्कारमध्ये पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री असे तीन पुरस्कार आहेत, जे देशाचे सर्वोच्च पुरस्कार आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये मोदी सरकारने अनेक कुठेही नाव नसलेल्या, गाजावाजा नसलेल्या तळागाळातील सेवा करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. हे पुरस्कार १९५४ पासून देण्यात येत आहेत.