शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

सदा सर्वकाळ लोकांना तुम्ही फसवू शकत नाही

By admin | Published: February 07, 2017 5:45 AM

लोकांची दिशाभूल करणे मोदी सरकारला उत्तम जमते. पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारने अनेक फसव्या घोषणा केल्या. त्यातून निष्पन्न काय झाले?

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीलोकांची दिशाभूल करणे मोदी सरकारला उत्तम जमते. पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारने अनेक फसव्या घोषणा केल्या. त्यातून निष्पन्न काय झाले? नोटाबंदीच्या निर्णयानंतर किती काळा पैसा हाती आला? किती बनावट नोटा पकडल्या गेल्या? याची उत्तरे ना सरकारकडे आहेत ना रिझर्व बँकेकडे, असे सांगत आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील प्रत्येक मुद्द्याचा आधार घेत, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी लोकसभेत मोदी सरकारवर चौफेर टीकेची झोड उठवली. मंगळवारी लोकसभेत व त्यानंतर राज्यसभेत चर्चेचा समारोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी या आरोप व टीकांना उत्तरे देतील. सदासर्वकाळ सर्व लोकांना मूर्ख बनवणे शक्य होणार नाही, असे सांगून ते म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय पूर्वतयारीविना राबवला. कोट्यवधी लोकांना त्याचा छळ सोसावा लागला. १२५ पेक्षा अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्याबद्दल साधी दिलगिरीही हे सरकार व्यक्त करायला तयार नाही. रिझर्व्ह बँकेला गाफील ठेवूनपंतप्रधानांनी ८६ टक्के चलनाला कागदाचे तुकडे बनवले. अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयाची कल्पना रिझर्व बँकेच्या फक्त दोन संचालकांना केवळ एक दिवस आधी देण्यात आली. महत्त्वपूर्ण संस्थांचे हे अवमूल्यनच नाही काय? ‘प्रेम माझ्यावर आणि विवाह मात्र दुसऱ्याशी’ अशी मोदी सरकारची वृत्ती आहे, या खरगेंच्या या वाक्यावर सभागृहात उपस्थित असलेल्या पंतप्रधान मोदींनाही हसू आवरले नाही. संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार, अनुराग ठाकुर, निशिकांत दुबेंसह बहुतांश सत्ताधारी खासदारांनी खरगेंच्या भाषणात वारंवार व्यत्यय आणला मात्र त्यांना दाद न देता खडगेंनी जवळपास ७0 मिनिटे सरकारची हजेरी घेतली. अभिभाषणावरील आभार प्रस्तावाची सुरुवात पर्यटनमंत्री महेश शर्मांनी केला. ते म्हणाले की, भारताचे भविष्य बदलण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय सरकारने घेतला. काळया पैशांवर इतका मोठा प्रहार यापूर्वी देशात कोणीही केला नव्हता. पाकव्याप्त काश्मीरमधे सर्जिकल स्ट्राईक करण्यासह अनेक साहसी पाऊ ले सरकारने उचलली. असे निर्णय घ्यायला ५६ इंचाची छाती लागते. दोन वर्षांत ११ हजार गावांमधे वीज पोहोचली. जनधन खाती उघडून देशातल्या २७ कोटी लोकांना बँकिंग सिस्टिमचा भाग बनवले. संरक्षण व्यवस्थेत वन रँक वन पेन्शन प्रत्यक्ष लागू करण्याची हिंमत मोदी सरकारने दाखवली.भाजपचे वीरेंद्रसिंग म्हणाले, नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा बराच गवगवा सुरू आहे. प्रत्यक्षात असे घडले असते तर रब्बीच्या सर्व पिकांचे क्षेत्र यंदा वाढलेच नसते. राहुल गांधी आणि अखिलेश यादवांचे नाव न घेता दोघांच्या रोड शोची खिल्ली त्यांनी उडवली. तृणमूलच्या सौगत राय यांनीही सरकारच्या विविध निर्णयांवर घणाघाती हल्ला चढवला. राज्यसभेतही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला आज सुरुवात झाली.