"कानाला बंदूक लावून..."; अध्यादेशाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा AAP वर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 07:57 PM2023-06-24T19:57:27+5:302023-06-24T19:58:00+5:30

...तर दुसरीकडे काँग्रेसही आपल्या मतावर ठाम दिसत आहे. काँग्रेसने आपला तेवढ्याच कठोर शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.  आपले म्हणणे मान्य करून घेण्यासाठी आमच्या कानाला बंदूक ठेवू नका, असे काँग्रेसने म्हटले आहे.

you can not put a gun to ourhead and ask us to decide Congress hits back at AAP over delhi ordinance issue | "कानाला बंदूक लावून..."; अध्यादेशाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा AAP वर पलटवार

"कानाला बंदूक लावून..."; अध्यादेशाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा AAP वर पलटवार

googlenewsNext

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात एकत्र येण्यासाठी विरोधक प्रयत्न करत असतानाच काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात वाद निर्माण झाला आहे. या वादाचे कारण म्हणजे, मोदी सरकारने दिल्लीसंदर्भात आणलेला एक अध्यादेश. या अध्यादेशाविरोधात संसदेत मतदान करण्याचा विश्वास मिळेपर्यंत काँग्रेससोबत कोणत्याही आघाडीत अथवा बैठकीत सहभागी होणार नाही, असे आम आदमी पक्षाने स्पष्ट केले आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसही आपल्या मतावर ठाम दिसत आहे. काँग्रेसने आपला तेवढ्याच कठोर शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.  आपले म्हणणे मान्य करून घेण्यासाठी आमच्या कानाला बंदूक ठेवू नका, असे काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि महासचिव केसी वेणुगोपाल यांना या मुद्द्यावर टीएमसी आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचीही साथ मिळाली आहे. या दोन्ही पक्षांनी दिल्ली अध्यादेशा मुद्दा पाटणा येथील बैठकीचा मुख्य मुद्दा बनविण्याच्या अरविंद केजरीवाल यांच्या प्रयत्नांवर प्रश्न उपस्थित केला आहे.

याशिवाय आम आदमी पक्षाने जारी केलेल्या निवेदनातील भाषेवरही काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. आपची भाषा भडकाऊ असल्याचे खर्गे यांनी म्हटले आहे. तसेच, 'आप आमच्या कानाला बंदूक लावून निर्णय घेण्यास सांगू शकत नाही,' असे काँग्रेस महासचिव वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना खर्गे म्हणाले, अधिवेशन सुरू असताना विरोधी पक्ष संसदेच्या मुद्द्यांवर चर्चा करतात. संसदेत विरोधकांची रणनीती ठरवण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत आम आदमी पक्षाचे नेतेही असतात. अध्यादेशाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट करण्याचा केजरीवाल यांच्या आग्रासंदर्भात खर्गे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Web Title: you can not put a gun to ourhead and ask us to decide Congress hits back at AAP over delhi ordinance issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.