PM Narendra Modi ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत एनडीए'ला बहुमत मिळाले. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने 'मोदी का परिवार' हे कॅम्पेन मोठ्या प्रमाणात राबवले. भाजपा नेत्यांसह कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या प्रोफाईलवर 'मोदी का परिवार' असं लिहून हे कॅम्पेन राबवले आहे. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये 'मोदी का परिवार' हे कॅम्पेन हटवण्याची विनंती केली आहे.
Maharashtra Politics : महायुतीत धुसफूस! "...तर आम्ही २२८ जागा मागायच्या का?", भाजपा नेत्याचा सवाल
लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाच्या नेत्यांनी मोदी परिवाराचा प्रचार केला होता. या अंतर्गत भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आपल्या नावापुढे 'मोदी का परिवार' असे लिहिले होते. सर्व लोक त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून 'मोदी का परिवार' हटवू शकतात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले आहे.
पोस्टमध्ये पीएम मोदी म्हणाले, "लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान,देशातील लोकांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'मोदी का परिवार' असे माझ्याबद्दलच्या त्यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून लिहिले होते. यामुळे मला खूप बळ मिळाले. भारतीय जनतेने एनडीए'ला सलग तिसऱ्यांदा बहुमत दिले आहे, हा एक प्रकारचा विक्रम आहे आणि आपल्या देशाच्या भल्यासाठी काम करत राहण्याचा जनादेश दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही सर्व एक कुटुंब आहोत, हा संदेश प्रभावीपणे पोहोचवल्यानंतर, मी पुन्हा एकदा भारतातील जनतेचे आभार मानू इच्छितो आणि विनंती करतो की आता तुम्ही तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'मोदी का परिवार' हे काढू शकता. पण भारताच्या प्रगतीसाठी झटणारे कुटुंब म्हणून आमचे नाते मजबूत आणि अतूट आहे, असंही पोस्टमध्ये म्हटले आहे.