शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

लसींचा पुरेसा साठा नाही आणि तुम्ही वैताग आणणारी कॉलरट्यून का ऐकवता?, कोर्टानं सरकारला झापलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 9:38 PM

देशातील जनतेला कोरोना लस घेण्याचं आवाहन करणाऱ्या डायलर कॉलरट्यूनच्या मुद्द्यावरुन दिल्ली हायकोर्टानं केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

देशातील जनतेला कोरोना लस घेण्याचं आवाहन करणाऱ्या डायलर कॉलरट्यूनच्या मुद्द्यावरुन दिल्ली हायकोर्टानं केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. देशात नागरिकांना पुरतील इतक्या लसीच नाहीत आणि दुसरीकडे लोकांना लस घेण्याचं आवाहन करणाऱ्या कॉलरट्युननं वैताग आणला आहे, असा स्पष्ट शब्दांत हायकोर्टानं केंद्राला सुनावलं आहे. (You Do Not Have Enough Vaccines And You Are Asking People To Get Vaccinated On The Annoying Dialer Tune says HC)

"देशातील नागरिक जेव्हा एखाद्याला फोन करतात तेव्हा आम्हाला नेमकं माहित नाही की लसीकरणाची कॉलरट्यून नेमकी किती दिवसांपासून सुरू आहे. पण त्यानं लोक वैतागलेत इतकं नक्की आणि देशात आवश्यक इतका लसींचा साठाच नसताना अशा कॉलरट्यूनचा भडीमार कशासाठी? जर तुमच्याकडे लसच उपलब्ध नाही, मग लोकांना लस घेण्याचं आवाहन करण्यामागचा हेतू काय? या मेसेजचा नेमका अर्थ काय?", अशा प्रश्नांची सरबत्ती दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश विपिन सांघी आणि न्यायाधीश रेखा पल्ली यांच्या खंडपीठानं सुरू केली. काहीतरी नवा विचार करा, हायकोर्टाचा सल्ला

लसीकरणाचं आवाहन करणारी कॉलरट्युन तुम्ही लोकांना दररोज ऐकवत आहात मग त्यात काहीतरी नाविण्य हवं. रोज एकच संदेश देण्यापेक्षा वेगवेगळ्या पद्धतीनं विविध संदेश देऊन वैविध्यता राखण्याचा प्रयत्न सरकारनं करायला हवा, असा सल्ला हायकोर्टानं दिला आहे. देशातील लोकप्रिय व्यक्तींची मदत घ्यायला हवी

"जोवर टेप खराब होत नाही तोवर तुम्ही एकच सूचना वारंवार लोकांना देतच राहणार आहात का? केंद्र किंवा राज्य सरकारांना वास्तविक परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार विविध संदेश तयार करणं गरजेचं आहे. जेव्हा लोक वेगवेगळ्या सूचना ऐकतील तेव्हा त्यांना मदतही होईल. याशिवाय समाजातील लोकप्रिय व्यक्तींची यासाठी मदत घेणं गरजेचं आहे. कारण एक मोठा वर्ग अशा लोकप्रिय व्यक्तींना फॉलो करत असतो", असंही कोर्टानं नमूद केलं आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसHigh Courtउच्च न्यायालय