"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 10:44 PM2024-11-27T22:44:46+5:302024-11-27T22:46:48+5:30
यावेळी पात्रा यांनी ईव्हीएमचा नवा अर्थही सांगितला, ते म्हणाले, "ईव्हीएमचा अर्थ, 'ई'पासून ऊर्जा, 'व्ही'पासून विकास आणि 'एम'पासून मेहनत. यामुळेच भारजपचा विजय होतो. काँग्रेसने आपल्या पराभवासाठी ‘आरबीएम’ला (राहुल यांचे बेकार मॅनेजमेंट) जबाबदार ठरवायला हवे."
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी बुधवारी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) काढून बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याच्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मागणीला प्रत्युत्तर देताना पात्रा यांनी काँग्रेसने मंगळावर जाऊन निवडणूक लढवावी, असा टोला लगावला आहे. एवढेच नाही तर, खर्गे यांचे वक्तव्य हास्यास्पद आणि जनतेच्या निर्णयाचा अपमान असल्याचे पात्रा यांनी म्हटले आहे.
संबित पात्रा यांचा पलटवार -
मल्लिकार्जुन खर्ग यांनी ईव्हीएमसंदर्भात बोलताना नुकतेच म्हटले होते की, "यामुळे ओबीसी, एससी, एसटी आणि दुर्बल घटकांतील लोक जी मते टाकत आहेत ती वाया जात आहेत. आमचे म्हणणे आहे की, सर्व सोडा आणि बॅलेट पेपरद्वारे मतदान करा." यावर पलटवार करत संबित पात्रा म्हणाले, "या वर्गाला ईव्हीएम कसे वापरायचे हे कळत नाही, असे काँग्रेस मानते का? हा विचार त्यांचा अपमान करणारा आहे." याचवेळी खर्गे यांचा हा तर्क फेटाळून लावत, ही काँग्रेसची निराशा असल्याचेही पात्रा म्हणाले.
"मंगळावर जाऊन निवडणूक लढा" -
पुढे बोलताना बोचरा हल्ला करत संबित पात्रा म्हणाले, ""खर्गे जी म्हणतात की, त्यांना ईव्हीएम, ईडी, सीबीआय आणि भारत सरकार नको आहे. असे असेल तर त्यांच्यासाठी सर्वात चांगले ठीकाण मंगळ ग्रह आहे. तेथे ना ईव्हीएम आहे ना निवडणूक आयोग. तेथे तुमच्या राजकुमाराला (राहुल गांधी) खुर्चीवर बसवा."
पात्रांनी सांगितला ईव्हीएमचा नवा अर्थ -
यावेळी पात्रा यांनी ईव्हीएमचा नवा अर्थही सांगितला, ते म्हणाले, "ईव्हीएमचा अर्थ, 'ई'पासून ऊर्जा, 'व्ही'पासून विकास आणि 'एम'पासून मेहनत. यामुळेच भारजपचा विजय होतो. काँग्रेसने आपल्या पराभवासाठी ‘आरबीएम’ला (राहुल यांचे बेकार मॅनेजमेंट) जबाबदार ठरवायला हवे."