'तुम्हाला पंजाचे बटण दाबावे लागेल...', काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी CM केजरीवाल मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 21:03 IST2024-05-15T21:03:12+5:302024-05-15T21:03:24+5:30
Arvind Kejriwal road show: दिल्लीतील सर्व सात जागांसाठी 25 मे रोजी मतदान होत आहे.

'तुम्हाला पंजाचे बटण दाबावे लागेल...', काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी CM केजरीवाल मैदानात
Arvind Kejriwal road show : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहे. येत्या 25 मे रोजी येथे सर्व आठ जागांसाठी मतदान होत आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली काढली. चांदणी चौक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार जेपी अग्रवाल यांच्यासाठी केजरीवाल मैदानात उतरले.
दिल्ली की जनता इस बार भाजपा की तानाशाही को करारा जवाब देगी। लोकसभा चुनाव प्रचार में आज चाँदनी चौक संसदीय क्षेत्र के मॉडल टाउन में रोड-शो।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 15, 2024
https://t.co/Oexhao7KYm
यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. कमळाचे बटण दाबले तर मला तुरुंगात जावे लागेल, पण काँग्रेसचे बटण दाबले तर तुरुंगात जावे लागणार नाही, असे केजरीवाल म्हणाले. केजरीवाल पुढे म्हणतात, या लोकांनी मला तुरुंगात टाकले, तुरुंगात तुमची खूप आठवण यायची. मी दिल्लीतील लोकांना मोफत उपचार आणि औषधे दिली, पण मी तिहारला त्यांनी मला 15 दिवस मधुमेहाचे औषध दिले नाही. मी मधुमेहाचा रुग्ण आहे, माझे इन्सुलिनचे इंजेक्शनदेखील बंद केले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मी थेट तुम्हा सर्वांकडे आलो. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.
झाडूवाल्यांनाही पंजाचे बटण दाबावे लागेल
मुख्यमंत्री केजरीवाल पुढे म्हणाले, हे लोक म्हणत आहेत की, केजरीवालांना पुन्हा तुरुंगात जावे लागेल. मी तुरुंगात जाणार की, नाही हे तुमच्या हातात आहे. दिल्लीत आमची इंडिया आघाडी आहे. आपल्याला इंडिया आघाडीचे उमेदवार जय प्रकाश अग्रवाल यांना विजयी करावे लागणार आहे. आता झाडूवाल्यांनाही पंजाचे बटण दाबावे लागणार आहे, असे आवाहन केजरीवालांनी यावेळी केले.