भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार आणि हरियाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महिला अॅथलिट प्रशिक्षिकेने हे गंभीर आरोप केले आहेत. अभय चौटाला यांच्यासोबत आयएलडीच्या ऑफीसमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत या महिला अॅथलिट कोचनी सांगितले की, मी ४००मी नॅशनल अॅथलिट कोच म्हणून, पंचकुला येथे काम सुरू केले आहे. क्रीडामंत्री नेहमी तिथे येत असतात. क्रीडामंत्री संदीप सिंह यांनी इन्स्टाग्रामवर माझ्यासोबत चॅट केलं होतं. हे चॅट वॅनिश मोडवर केलं होतं. त्यामुळे हा मेसेज २४ तासांमध्ये डिलीट झाला.
या घटनेबाबत या महिला कोचने सांगितले की, क्रीडामंत्र्यांनी स्नॅपचॅटवर माझ्याशी चॅटिंग केलं होतं. त्यानंतर मला सेक्टर ७ लेक साईट येथे भेटण्यासाठी बोलावले. मी तिथे गेले नाही. त्यानंतर ते मला इन्स्टाग्रामवर ब्लॉक अनब्लॉक करत राहिले. त्यानंतर त्यांनी मला एका ड्यॉक्युमेंटचं निमित्तकरून घरी बोलावले. मी तिथे गेले. ते कॅमेरा असलेल्या ऑफिसमध्ये बसू इच्छित नव्हते. ते मला वेगळ्या केबिनमध्ये घेऊन गेले. तिथे त्यांनी माझ्या पायावर हात ठेवला. त्यानंतर म्हणाले की, तू मला खूश ठेव, मी तुला खूश ठेवेन.
क्रीडामंत्र्यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केले. माझी बदली झज्जर येथे करण्यात आली. तिथे १०० मीटरचं मैदानही नाही आहे. अनेक खेळाडूंचा उल्लेख करत त्यांना मी वरपर्यंत पोहोचलले आहे, असे ते म्हणाले. मी कशीबसी स्वत:ला वाचवून ती तिथून पळाली. तेथील स्टाफ माझी अवस्था पाहून हसत होता. त्यानंतर मी डीजीपींच्या पीएसना फोन केला. मुख्यमंत्र्यांच्या पीएसना फोन केला. पण मला कुठलीही मदत मिळाली नाही, असा आरोपही या महिला प्रशिक्षकाने केला.