नवी दिल्ली : आम आदमी पार्टीतील परस्परांविरुद्ध दंड थोपटणारे दोन गट आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने गुरुवारी समेटाचे प्रयत्न निष्फळ ठरले. अरविंद केजरीवाल यांचा गट आमच्या चिंता विचारात न घेता आम्हाला राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा देण्यासाठी दबाव आणत आहे, असा आरोप वरिष्ठ नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी केला आहे. आम्ही स्वत:हून पक्ष सोडला, अशी लोकांची समजूत व्हावी यासाठी प्रयत्नशील असणारे व आमच्या राजीनाम्याचा हवाला देणारे त्याचा तपशील जाहीर करतील काय , असा सवाल यादव यांनी टिष्ट्वटद्वारे केला आहे. दुसरीकडे विरोधी गट पक्षाच्या संयोजकपदावरून केजरीवाल यांना हटविण्याची मागणीवर ठाम असल्याचे केजरीवाल गटाचे म्हणणे आहे. आम्ही सन्मानाने राजीनामा द्यावा अथवा जबरदस्तीने हटविले जाईल, असा इशारा आम्हाला देण्यात आला असल्याचा उल्लेख भूषण आणि यादव यांनी आप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या २८ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीआधी केजरीवालांना पाठविलेल्या खुल्या पत्रात केला आहे.चर्चा निष्फळकेजरीवालांना राष्ट्रीय संयोजक पदावरून हटविण्याच्या मागणीवर भूषण आणि यादव ठाम असून समेटासंबंधी चर्चा अयशस्वी ठरली असल्याचे आपचे केजरीवालांशी निष्ठा असलेले नेते आशुतोष यांनी टिष्ट्वटरवर दिलेल्या संदेशात म्हटले. या दोन नेत्यांच्या सर्व मागण्या आम्ही मान्य केल्या असताना ते केजरीवाल यांना हटविण्याच्या मागणीवर अडून का आहेत, याबाबत आशुतोष यांनी आश्चर्यही व्यक्त केले.
‘आप’कलह शिगेला; समेटाचे प्रयत्न फसले
By admin | Published: March 27, 2015 1:20 AM