थिएटरमध्ये अक्षय-कॅटचा रोमँटिक सीन सुरू असतानाच तरुणानं तरुणीला छेडलं, मग प्रत्येक प्रेक्षक बनला हीरो
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 12:20 AM2021-11-08T00:20:09+5:302021-11-08T00:21:01+5:30
आधी मुलीने तिची सँडल काढून त्या तरुणाला मारहाण करायला सुरुवात केली. यानंतर प्रेक्षकही त्या तरुणावर तुटून पडले. आधी या सर्वांनी या तरुणाला चित्रपटगृहात चोप दिला. यानंतर चित्रपटगृहाबाहेर नेऊनही त्याची धुलाई करण्यात आली.
भोपाळमधील संगम चित्रपटगृहात रियल अॅक्शन सीन बघायला मिळाला. येथे सूर्यवंशी चित्रपटाचा शेवटचा शो सुरू होता. अक्षय आणि कॅटरीनाचा रोमँटिक सीन साधारणपणे 12 वाजता पडद्यावर आला. यादरम्यानच, एका तरुणाने मागे बसलेल्या तरुणीशी अश्लील हावभाव केले आणि अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. मग काय, खरा चित्रपटच सुरू झाला.
आधी मुलीने तिची सँडल काढून त्या तरुणाला मारहाण करायला सुरुवात केली. यानंतर प्रेक्षकही त्या तरुणावर तुटून पडले. आधी या सर्वांनी या तरुणाला चित्रपटगृहात चोप दिला. यानंतर चित्रपटगृहाबाहेर नेऊनही त्याची धुलाई करण्यात आली. मात्र, हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले नाही. मंगलवाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप पवार यांनी सांगितले, घटनेची माहिती अद्याप आलेली नाही. एकही तक्रारदार पोलीस ठाण्यात पोहोचलेला नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पोलिसांनी तपासासाठी घेतला आहे.
रोमँटिक सीन सुरू असतानाच घढला प्रकार -
अक्षय आणि कॅटरिनाच्या रोमँटिक सीनदरम्यान तरुणाने मागे वळून अश्लील कृत्य करायला सुरुवात केली. यावेळी त्याने 'छोडो कल की बात...', अशी कमेंट केली. एवढेच नाही, तर तो वारंवार मागे वळून संबंधित तरुणीकडे बघत होता. यादरम्यान, मुलीने त्याला थांबवलेही, पण त्याने ऐकले नाही.
यानंतर, तरुणीने आणि तेथील लोकांनी या युवकाला चोप दिला. यावेळी तो गयावयाही करत होता. मात्र, लोक त्याला मारतच होते. अद्याप संबंधित तरुणाची ओळख पटू शकलेली नाही. जमावाने तरुणाला मंगलवारा पोलीस ठाण्यात नेण्यापूर्वीच, त्याचे मित्र, तेथे आले आणि त्यांनी त्या तरुणाला तरुणीची माफी मागायला सांगितली. यानंतर प्रकरण शांत झाले. आरोपी तरूण जुन्या शहरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.