ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - जम्मू-काश्मीरमधल्या माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. यावेळी सीमेपलीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला आहे. तर भारतानंही प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. तत्पूर्वी काल जम्मू-काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला होता. त्यावेळी पाकिस्ताननं नियंत्रण रेषेवरच्या भारतीय चौक्यांना लक्ष्य करून अंदाधुंद गोळीबार करून मोर्टार फेकले होते. त्यानंतर भारतीय जवानांनीही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. भारताकडून करण्यात आलेल्या गोळीबारात पाकिस्तानच्या ब-याचशा चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत.
दोन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू-काश्मीरमधल्या सोपोर सेक्टरमध्ये सेनेच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं वृत्त आहे.