कोणत्याही देशाचा राष्ट्रपती म्हटले, तर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाचा चेहरा समोर येतो. सामान्यतः वयाची साठी ओलांडलेली व्यक्ती राष्ट्रपती म्हणून आपण पाहतो; परंतु जगात असेही काही देश आहेत, जिथे तरुणांनाही राष्ट्रपतीपदी विराजमान होता येते. वाचून आश्चर्य वाटेल; पण हे खरे आहे.
भारतातील राष्ट्रपतीपदाची पात्रता -- संविधानाच्या कलम ५८ नुसार भारताचा नागरिक असावा.- वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावीत.- लोकसभेचा सदस्य होण्यास पात्र असावा.- केंद्र वा राज्य सरकारमध्ये कोणतेही लाभाचे पद धारण केलेले नसावे.
बहुतांश देशात ३५ वयोमर्यादाजगातील बहुतांश देशांमध्ये राष्ट्रपतीपदासाठी वयोमर्यादा ही ३५ वर्षे इतकी आहे. त्यात प्रामुख्याने भारत, अमेरिका, इंडोनेशिया, आयर्लंड, आइसलँड, मेक्सिको, रशिया, नायजेरिया, पोलंड, पोर्तुगाल आदी देशांचा समावेश आहे.
भारतातील तरुण राष्ट्रपती -नीलम संजीव रेड्डी हे आतापर्यंत भारताचे सर्वांत तरुण राष्ट्रपती होते. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतली. द्रौपदी मुर्मू यादेखील ६४ व्या वर्षी राष्ट्रपती झाल्या असल्या, तरी नेमके वय लक्षात घेतल्यास मुर्मू या सर्वांत तरुण राष्ट्रपती आहेत.