लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोनानंतर चुकीची जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या अनियमित सवयी, अति ताणतणाव यामुळे कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि लठ्ठपणा वाढत असून, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढत आहे. यात सर्वाधिक बळी तरुणांचा जात आहे. जगभरात दरवर्षी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी सुमारे एक चतुर्थांश मृत्यू भारतात होत असून, ही संख्या १.८ कोटी इतकी आहे.
फिटनेससाठी सूर्यनमस्कार हा सर्वोत्तम व्यायाम आहे. मोबाइलचा वापर कमी करा. ध्यान आणि योग्य झोपेची सवय लावा. याचसोबत मानसिक ताण कमी करण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
अलीकडील प्रकरणे...४२ वर्षीय माजी मिस्टर इंडिया आणि बॉडी बिल्डर प्रेमराज अरोरा हे बाथरूममध्ये आंघोळ करत असताना अचानक बेशुद्ध पडले. त्याच्या मृत्यूचे कारण सायलेंट अटॅक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गुजरातच्या गोडादरा क्षेत्रात एका खासगी शाळेत आठवी इयत्तेत शिकणाऱ्या १२ वर्षीय मुलीला हार्ट अटॅक आल्याने ती जमिनीवर कोसळली. यात तिचा मृत्यू झाला.गुजरातच्या जामनगरमध्ये दांडियाचा सराव करताना १९ वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू.राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात मेहुणीच्या लग्नात डीजेवर नाचणाऱ्या ३० वर्षीय भाउजीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.
नेमके काय कराल? n शून्य साखर असलेला संतुलित आहार घ्या. n गव्हाचा वापर कमी करा. बाजरी, ज्वारी, मका, हरभरा, नाचणी, सोयाबीन इत्यादींचा वापर वाढवा.n प्रथिने चांगल्या प्रमाणात घ्या. तेल आणि तूप कमी प्रमाणात घ्या आणि कच्ची फळे आणि भाज्या आहारात वाढवा.n दररोज १० हजार पावले चालण्याचा नियम बनवा.n बसण्याची वेळ ५० टक्क्यांनी कमी केल्यास आजार ८० टक्क्यांनी कमी करता येतात. दिवसभर अधिकाधिक उभे राहा आणि वारंवार चाला.n पुशअप्स, वेट लिफ्टिंग इत्यादींसारखे काही ताकदीचे व्यायाम करा. n .
आपल्या चुका? n वयानुसार खेळ/व्यायाम न बदलणे. n स्वस्थता, वेदना, श्वास घेण्यात अडचण अशी लक्षणे दिसू लागल्यास शारीरिक हालचाली न थांबवणेn रक्तदाब, कोलेस्टेरॉल, शुगर इ.चे