युवतींना व्हीआयपींसोबत शय्यासोबतीची जबरदस्ती; आठ माजी मंत्री अडकल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 02:03 AM2019-09-28T02:03:44+5:302019-09-28T06:57:24+5:30

२४ महाविद्यालयीन युवतींना ट्रॅपमध्ये ओढले

Young women forced to sleep with VIPs | युवतींना व्हीआयपींसोबत शय्यासोबतीची जबरदस्ती; आठ माजी मंत्री अडकल्याची चर्चा

युवतींना व्हीआयपींसोबत शय्यासोबतीची जबरदस्ती; आठ माजी मंत्री अडकल्याची चर्चा

googlenewsNext

इंदूर : मध्य प्रदेशमध्येहनीट्रॅप प्रकरणात व्हीआयपी व्यक्तींबरोबर शय्यासोबत करण्यासाठी २४ महाविद्यालयीन युवतींना भाग पाडण्यात आले होते. ही माहिती हनीट्रॅपची सूत्रधार श्वेता जैन हिने पोलिसांनी दिलेल्या जबाबातून उघड झाली आहे.

हनीट्रॅप व खंडणी प्रकरणात बारा आयएएस अधिकारी व आठ माजी मंत्री अडकले असल्याची चर्चा आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या व कनिष्ठ मध्यमवर्गीय असलेल्या २४ मुलींना श्वेता जैनने जबरदस्तीने हनीट्रॅपमध्ये सहभागी करून घेतले होते. श्वेताने पोलिसांना सांगितले की, कोट्यवधी रुपयांची सरकारी कंत्राटे मिळविण्याच्या उद्देशाने हनीट्रॅपचा सापळा रचला जात असे. शय्यासोबतीच्या वेळी नेते, आयएएस अधिकाऱ्यांची आक्षेपार्ह अवस्थेतील छायाचित्रे, व्हिडिओफिती गुप्तपणे चित्रित करण्यात येत. त्या आधारे सरकारी कंत्राटे पदरात पाडून घेतली जात. एका प्रसिद्ध महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करणारी मोनिका हनीट्रॅपची सूत्रधार श्वेता जैन हिच्या संपर्कात आली.

मोनिकाला विश्वासात घेण्यासाठी श्वेता तिला भोपाळच्या सचिवालयामध्ये घेऊन गेली व तिथे तिची तीन आयएएस अधिकाºयांशी ओळख करुन देण्यात आली. मात्र त्याला न भुलता मोनिका नरसिंगगढ येथील आपल्या घरी परतली. त्यानंतर श्वेताची साथीदार आरती दयालने मोनिकाच्या घरी जाऊन तिला शिक्षणाकरिता भोपाळला पाठविण्यासाठी तिच्या वडीलांना राजी केले. (वृत्तसंस्था)

अशी फुटली वाचा
मोनिकाच्या वडिलांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने व माणसे विश्वासाची वाटल्याने त्यांनीही या गोष्टीला होकार दिला.
३० ऑगस्टला रात्री आरतीने मोनिकाला जबरदस्तीने आयएएस अधिकारी हरभजनसिंग यांच्याशी शय्यासोबत करायला भाग
पाडले.
त्यावेळचे छुपे व्हिडिओ चित्रीकरणही आरतीने केले. त्याच्या आधारे हरभजनसिंग यांच्याकडून श्वेता जैन हिने काही कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. मात्र हरभजनसिंग यांनी पोलिसांत तक्रार करताच हनीट्रॅप प्रकरणाला वाचा फुटली.

Web Title: Young women forced to sleep with VIPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.