भोपाळ- मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि काँग्रेसनं प्रचार सभांचा धडाका लावला आहे. रविवारीही अलिराजपूरमध्ये भाजपाची एक सभा झाली. या सभेत एका तरुणानं रोजगाराच्या मुद्द्यावरून भाजपा नेत्यांना फटकारलं आहे. जोबातमधल्या उमदा गावात जनसभेला संबोधित करत असलेले भाजपा उमेदवार माधव सिंह यांना एका तरुणानं नोकरीवरून जाब विचारला आहे.तो म्हणाला, सत्तेवर आल्यानंतर भाजपानं नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु अद्यापही तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिलेला नाही. ग्रामीण आणि आदिवासी तरुणांच्या रोजगारासाठी तुम्ही काय केलेत, असा प्रश्नही त्या तरुणानं विचारला आहे. गावागावात शिक्षणांची टंचाई असून, शाळेत असलेले शिक्षकही मुलांना शिकवण्यासाठी निरुत्साही असतात, असंही तो मुलगा म्हणाला आहे.मध्य प्रदेशमध्ये भाजपानं जोरदार प्रचार सुरू केला आहे. केंद्रातील अनेक नेते मध्य प्रदेश भाजपाचा प्रचार करत आहेत. परंतु आता तेथील जनता भाजपानं एवढ्या वर्षात काय विकास केला, असा प्रश्न उपस्थित करू लागली आहे. त्यामुळे एक प्रकारे भाजपाची कोंडी झाली आहे.
नोकऱ्यांच्या प्रश्नावरून तरुणानं भाजपा नेत्याला विचारला जाब
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 10:59 AM