नवी दिल्ली : निश्चल नारायणनम हा १९ वर्षाचा युवक सीए बनला आहे. गणितज्ञ म्हणून त्याची आधीची ओळख आहे. आता तो चार्टर्ड अकाऊंटंट वा सी ए ची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे, पण त्याला चार्टर्ड अकाऊंटंट म्हणून नोंद होण्यासाठी दोन वर्षे वाट पाहावी लागणार आहे. कारण चार्टर्ड अकाऊंटंट संस्थेच्या नियमानुसार सदस्य होण्याचे किमान वय २१ आहे. नारायणनमला त्याच्या स्मरणशक्तीसाठी अनेक पुरस्कार व पदके मिळाली. नारायणनम दोन वेळा गिनीज बुकाचा विजेता ठरला आहे. नॅशनल जिआॅग्राफिक वाहिनीने त्याची नोंद जगातील ७ बुद्धिमान मेंदूपैकी एक म्हणून केली आहे. उस्मानिया विद्यापीठाच्या इतिहासात त्याची नोंद सर्वात लहान वयाचा पदवीधर म्हणून झाली आहे. या विद्यापीठातून त्याने बी. कॉम. व एम. कॉम.ची पदवी घेतली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सर्वात लहान वयाचा सीए
By admin | Published: July 25, 2015 12:09 AM