तुमचे धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देतोय;द्रौपदी मुर्मू, मोदी, गडकरींचे ४१ मजुरांना उद्देशून ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 09:50 PM2023-11-28T21:50:30+5:302023-11-28T21:52:02+5:30

उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. वेगवेगळे प्रयत्न करूनही गेले १७ दिवस या मजुरांना ढिगाऱ्याच्या ...

Your courage and patience are an inspiration to all; Prime Minister Modi, Gadkari's Draupadi Murmu tweet addressed to 41 laborers resque uttarakhand tunnel | तुमचे धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देतोय;द्रौपदी मुर्मू, मोदी, गडकरींचे ४१ मजुरांना उद्देशून ट्विट

तुमचे धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देतोय;द्रौपदी मुर्मू, मोदी, गडकरींचे ४१ मजुरांना उद्देशून ट्विट

उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. वेगवेगळे प्रयत्न करूनही गेले १७ दिवस या मजुरांना ढिगाऱ्याच्या आतच अडकून रहावे लागले होते. अखेर ऑगर मशीनने अर्धवट सोडलेले खोदाईचे काम रॅट मायनिंगच्या कामगारांनी पूर्ण केले आणि या सर्वांची सुटका झाली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून मजुरांच्या धैर्याला सलाम केला आहे. 

आमच्या कामगार बांधवांच्या बचावकार्याचे यश सर्वांनाच भावूक करणार आहे. बोगद्यात अडकलेल्या मित्रांना मी सांगू इच्छितो की तुमचे धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देत आहे. मी तुम्हा सर्वांना चांगले आणि चांगले आरोग्य इच्छितो, असे मोदींनी ट्विट केले आहे. 

४१ मजुरांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आल्याने मी खूप आनंदी आहे. अनेक एजन्सींनी केलेला एक चांगल्या नियोजनाचे हे यश आहे. सर्वांच्या अथक आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे, सर्वांच्या प्रार्थनांमुळे हे ऑपरेशन शक्य झाले आहे. पंतप्रधान मोदी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी शक्य ती मदत केली. मी MorThच्या अधिकारी आणि अभियंत्यांना त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांबद्दल धन्यवाद देतो, असे ट्विट गडकरींनी केले आहे. 

इतिहासातील सर्वात कठीण बचाव मोहिमेपैकी एक मोहिम फत्ते..., राष्ट्रपती काय म्हणाल्या...
उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेल्या सर्व कामगारांची सुटका करण्यात आल्याचे ऐकून मला दिलासा आणि आनंद झाला. 17 दिवसांहून अधिक काळ त्यांचे कष्ट, जसे की बचाव कार्यात अडथळे आले, ते मानवी सहनशक्तीचा पुरावा आहे. देश त्यांच्या लवचिकतेला सलाम करतो आणि त्यांच्या घरापासून दूर, अत्यंत वैयक्तिक जोखमीवरही, महत्वाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्याबद्दल त्यांचे आभारी आहे. मी संस्था आणि सर्व तज्ञांचे अभिनंदन करते, ज्यांनी इतिहासातील सर्वात कठीण बचाव मोहिमेपैकी एक मोहिम फत्ते करण्यासाठी अविश्वसनीय धैर्याने आणि दृढनिश्चयाने काम केले आहे, असे ट्विट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे. 
 

Web Title: Your courage and patience are an inspiration to all; Prime Minister Modi, Gadkari's Draupadi Murmu tweet addressed to 41 laborers resque uttarakhand tunnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.