शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

तुमची ओळख हॉटेल, मॉटेल पटेलवाला! परदेशी पर्यटकांना भारतात पाठवा; मोदींचे गुजरात्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 5:45 AM

‘हॉटेल, मॉटेल पटेलवाला’ म्हणून तुमची अमेरिकेत ओळख आहे, अशा मजेशीर अंदाजात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत आयोजित सौराष्ट्र पटेल सांस्कृतिक संमेलनात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अमेरिकेत वसलेल्या पटेल समुदायाशी संवाद साधला, तसेच त्यांना भारतीय पर्यटन क्षेत्रात योगदान देण्याचे आवाहन केले.

नवी दिल्ली : ‘हॉटेल, मॉटेल पटेलवाला’ म्हणून तुमची अमेरिकेत ओळख आहे, अशा मजेशीर अंदाजात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत आयोजित सौराष्ट्र पटेल सांस्कृतिक संमेलनात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अमेरिकेत वसलेल्या पटेल समुदायाशी संवाद साधला, तसेच त्यांना भारतीय पर्यटन क्षेत्रात योगदान देण्याचे आवाहन केले. आपल्यापैकी प्रत्येक एक व्यक्ती किमान पाच लोकांना पर्यटनासाठी भारताला भेट देण्यासाठी उद्युक्त करू शकता का?यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘हॉटेल, मॉटेल पटेलवाला’ अशी तुमची अमेरिकेत ओळख आहे. मग तुमच्या हॉटेल, मॉटेलमध्ये आलेला पाहुणा टीव्हीत पाहत असेलच, तेव्हा त्या टीव्हीवर तुम्ही भारतीय पर्यटनावरील पाच मिनिटांची चित्रफीत दाखवू शकता, जेणेकरून तुमच्या हॉटेल, मॉटेलमध्ये आलेल्या पाहुण्याला भारत काय आणि कसा आहे, हे कळेल.कॅलिफोर्नियात आयोजित संमेलनाला मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेतील हॉटेल, मॉटेल क्षेत्रातील गुजराती पटेलांच्या असलेल्या वर्चस्वाचा विनोदाने ‘हॉटेल, मॉटेल पटेलवाला’ असा गमतीने उल्लेख केला. अमेरिकेत निम्म्याहून अधिक मॉटेल्स अनिवासी भारतीयांच्या मालकीची आहेत. यापैकी ७० टक्के मॉटेल्स अनिवासी गुजराती चालवितात, अशीही आकडेवारी समोर आलेली आहे.७० टक्के मॉटेल्स पटेलांचीचसाठच्या दशकात गुजराती पटेल समुदायाने अमेरिकेतील मॉटेल्स उद्योग क्षेत्रात पदार्पण केले, तेव्हापासून ‘पटेल-मॉटेल’ संकल्पना रूढ झाली, असे ‘स्मिथसोनियन’ या मासिकाने २०१४ मध्ये एका लेखात नमूद केले होते. अमेरिकेत कुठल्याही मॉटेलमध्ये गेल्यास तुम्हाला भारतीय-अमेरिकन परिवार दिसेलच, असेही या लेखात नमूद करण्यात आले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी