तुमचे अधिकारी दिवाळखोर आहेत; कोचिंग सेंटर मृत्युप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 05:42 AM2024-08-01T05:42:51+5:302024-08-01T05:44:16+5:30

जेव्हा ‘मोफत’ गोष्टींच्या संस्कृतीमुळे कर वसुली होत नाही तेव्हा अशा दुर्घटना घडतात, असे न्यायालय म्हणाले. 

your officers are insolvent delhi high court heard the coaching center case | तुमचे अधिकारी दिवाळखोर आहेत; कोचिंग सेंटर मृत्युप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावले

तुमचे अधिकारी दिवाळखोर आहेत; कोचिंग सेंटर मृत्युप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावले

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :उच्च न्यायालयाने यूपीएससी परीक्षार्थी मृत्यूप्रकरणी अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. तुमचे अधिकारी दिवाळखोर आहेत. तुमच्याकडे पगार देण्यासाठी पैसे नाहीत, तर तुम्ही पायाभूत सुविधा कशा सुधारित करणार? तुम्हाला मोफतची संस्कृती हवी आहे, तुम्हाला कर गोळा करायचा नाही. म्हणून तुम्ही पैसे खर्च करत नाहीत, त्यामुळे अशा शोकांतिका घडणे निश्चितच होते, असे खंडपीठाने म्हटले. जेव्हा ‘मोफत’ गोष्टींच्या संस्कृतीमुळे कर वसुली होत नाही तेव्हा अशा दुर्घटना घडतात, असे न्यायालय म्हणाले. 

जबाबदारी निश्चित करा 

अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित झाली तरच भविष्यात अशी कोणतीही घटना घडणार नाही. राजिंदरनगर परिसरातील नाल्यांवरील सर्व अतिक्रमणे शुक्रवारपर्यंत हटविण्याचे निर्देशही कोर्टाने यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

 

Web Title: your officers are insolvent delhi high court heard the coaching center case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.