शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

काही पैशांमध्ये विकली जाते तुमची वैयक्तिक माहिती

By admin | Published: March 01, 2017 4:20 AM

उत्पन्न, व्यवसाय आदींची माहिती अगदी रुपयांपेक्षा कमी किंमतीत म्हणजेज काही पैशांत विकली जाते असे सांगितले तर कदाचित विश्वास बसणार नाही.

बंगळुरू / नवी दिल्ली : तुमचा निवासी पत्ता, फोन नंबर, ई मेल आयडी, वय, वैवाहिक माहिती, उत्पन्न, व्यवसाय आदींची माहिती अगदी रुपयांपेक्षा कमी किंमतीत म्हणजेज काही पैशांत विकली जाते असे सांगितले तर कदाचित विश्वास बसणार नाही. पण, हे वास्तव आहे. डेटा ब्रोकर्स सर्रास ही माहिती विकत आहेत आणि तीही च्युर्इंग गमच्या दरात. ही माहिती विकणारे डेटा ब्रोकर्स पाहिजे त्या श्रेणीतील आणि शहरातील माहिती देऊ शकतात. यातील काही डेटा ब्रोकर्सशी संपर्क साधला असता असे दिसून आले की, ही माहिती ते १० ते १५ हजार रुपयात विकत आहेत. बंगळुरू, हैदराबाद आणि दिल्ली येथील एक लाख व्यक्तींची माहिती या ब्रोकरला मागितली असता ही माहिती देण्याची तयारी त्यांनी दर्शविली. विशेष म्हणजे उच्च उत्पन्न गट, के्रडिट कार्ड वापरणाऱ्या व्यक्ती, ज्यांच्याकडे स्वत: च्या कार आहेत, निवृत्त महिला अशा वर्गवारीतील माहितीही या ब्रोकरकडे आहे. काही ब्रोकर्सने तर फ्री सँपल्सही पाठविली. त्यात संबंधित व्यक्तींचे पत्ते, उत्पन्न, कार्ड (डेबिट, क्रेडिट, प्रीमियम) यांची माहिती होती. दिल्ली, एनसीआर, बंगळुरू येथील एक लाख ७० हजार नागरिकांची माहिती फक्त सात हजार रुपयांत देण्याची तयारी या ब्रोकर्सने दर्शविली. बंगळुरूमधील नागराज बी. के. यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. माझ्या परवानगीशिवाय माझी माहिती दुसऱ्या व्यक्तीला कशी समजते? हा तर गुन्हा आहे असे ते म्हणाले. त्यांनी आॅनलाइन खरेदी केलेल्या वस्तूंची माहिती ब्रोकरने परस्पर दुसऱ्याला दिली होती. असेच अनुभव अन्य काही जणांनाही आले आहेत. एका महिलेने आॅनलाईन खरेदी केलेल्या काही वस्तूंची यादीच या ब्रोकर्सच्या हाती लागली.यावर आॅनलाइन विक्री करणाऱ्या अ‍ॅमेझॉनचे म्हणणे आहे की, आमच्याकडून अशी कोणतीही माहिती लिक होत नाही. एचडीएफसी आणि एक्सिस बँकेने स्पष्ट केले आहे की, व्यक्तिगत माहितीबाबत आम्ही ग्राहकांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करत आहोत. (वृत्तसंस्था)।फसवणुकीचे प्रकार आर्थिक व्यवहारातील फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. के्रडिट, एटीएम/डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकींगमध्ये अशा फसवणुकीचे आठ हजारहून अधिक प्रकरणे रिझर्व्ह बँकेने दाखल केली आहेत. ।200अब्ज डॉलर्सचा धंदा जागतिक स्तरावर डेटा ब्रोकर्सचा व्यवसाय २०० अब्ज डॉलर्सचा असल्याचे सांगितले जाते. भारतातही हा व्यवसाय वाढत चालला आहे.