आपच्या त्सुनामीने एक्झिट पोलही उद्ध्वस्त
By admin | Published: February 11, 2015 12:33 AM
नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीच्या त्सुनामीने केवळ भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेससारख्या मोठ्या पक्षांचाच सफाया केला नाहीतर निवडणूक विशेषज्ञांचे दावे आणि एक्झिट पोलही पार उद्ध्वस्त करून टाकले.
नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीच्या त्सुनामीने केवळ भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेससारख्या मोठ्या पक्षांचाच सफाया केला नाहीतर निवडणूक विशेषज्ञांचे दावे आणि एक्झिट पोलही पार उद्ध्वस्त करून टाकले.बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये आपला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता हे खरे असले तरी हा पक्ष ६७ जागा काबीज करेल असे कुणी म्हटले नव्हते. आपचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव यांनी पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणाच्या आधारे ५१ जागांचा अंदाज व्यक्त केला होता. इंडिया न्यूजने आपल्या चाचणीत आपला सर्वाधिक ५३ जागा दिल्या होत्या. भाजपाला १७ तर काँग्रेसला २ जागा मिळतील,असेही भाकित वर्तविले होते. बहुतांश निवडणूक सर्वेक्षणात तंतोतंत भविष्यवाणी करणारे टुडेज चाणक्यही यावेळी जनतेची भावना समजण्यात अपयशी ठरले. त्याने आपला ४८ तर भाजपाला २२ जागा दिल्या होत्या. टाइम्स नाऊच्या महापोलमध्ये आपला ४१, भाजपा २७ आणि काँग्रेसला २ जागा मिळतील,असे भाकित केले होते. एबीपी- नेल्सनने आपला ३९, भाजपा २८ आणि काँग्रेसच्या पदरात ३ जागा टाकल्या होत्या. इंडिया टुडे-सिसरोच्या सर्वेक्षणात आपला ३५ ते ४६, भाजपाला २३ ते २९ आणि काँग्रेसला ३ ते ५ जागांचा अंदाज बांधला होता. न्यूज नेशनच्या एक्झिट पोलमध्ये आपला ३९ ते ४३, भाजपा २५ ते २९ आणि काँग्रेसला १ ते ३ जागा दिल्या होत्या.असे होते एक्झिट पोलइंडिया टुडे-सिसरोआप- ३८ ते ४६भाजपा- १९ ते २७काँग्रेस- ३ ते ५न्यूज २४-टुडेज चाणक्यआप- ४८भाजपा-२२काँग्रेस- एकही जागा नाहीएबीपी-नेल्सनआप- ३९भाजपा- २८काँग्रेस-३झी टीव्ही- से व्होटरआप- ३१ ते ३९भाजपा- २७ ते ३५काँग्रेस- २ ते ४इंडिया न्यूज-एक्सिसआप- ५३ (सर्वात जास्त)भाजपा- १७काँग्रेस-२इंडिया टीव्हीआप-३१ ते ३९भाजपा-२७ ते ३५काँग्रेस- २ ते ४न्यूज नेशनआप-४१ ते ४५भाजपा-२३ ते २७काँग्रेस- १ ते ३