"जो डोळे वटारत होता कटोरा घेऊन फिरतोय! तुमची इच्छा होती..., मोदीनं पूर्ण केली"; पंतप्रधानांची तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 05:01 PM2024-04-16T17:01:12+5:302024-04-16T17:02:12+5:30

"मोदीने तुमची इच्छा पूर्ण केली. जो देश डोळे वटारत होता, आज कटोरा घेऊन भटकत आहे.'

Your wished Modi fulfilled The prime minister narendra modi attacked opposition in purnia bihar | "जो डोळे वटारत होता कटोरा घेऊन फिरतोय! तुमची इच्छा होती..., मोदीनं पूर्ण केली"; पंतप्रधानांची तुफान फटकेबाजी

"जो डोळे वटारत होता कटोरा घेऊन फिरतोय! तुमची इच्छा होती..., मोदीनं पूर्ण केली"; पंतप्रधानांची तुफान फटकेबाजी

गेल्या 10 वर्षात एनडीए सरकारने अशा गोष्टी केल्या आहेत, ज्या पूर्वी अशक्य मानल्या जात होत्या. आज प्रत्येकजण म्हणत आहे, मोठी कामे करण्याची ताकद केवळ भाजपमध्ये आहे. पूर्वी शेजारचे देश हल्ले करून निघून जायचे. सीमेवर अशांतता होती. लोकांना दुःखासोबतच संतापही व्यक्त करत होते. यांच्या घरात घुसून मारायला हवे, असे तुम्हाला वाटत होते. मोदीने तुमची इच्छा पूर्ण केली. जो देश डोळे वटारत होता, आज कटोरा घेऊन भटकत आहे,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते मंगळवारी बिहारमधील पूर्णिया येथे एका प्रचार सभेला संबोधित करत होते. 

'भारत तोडणाऱ्यांच्या मनसुब्याला आग लागली' -
'तुमची इच्छा होती की काश्मीरमधून 370 हटायला हवे. मात्र, 370 हटवल्यास काश्मीरात आग भडकेल, असे अहंकारी आघाडीवाले म्हणत होते. आज कलम 370 हटले आहे आणि काश्मिरात नाही, तर भारताला तोडू इच्छिणाऱ्यांच्या मनसुब्यांना आग लागली आहे," अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. 

हा मोदी आहे, ना भितो, ना झुकतो -
मोदी म्हणाले, संविधानाच्या नावाखाली जे लोक आम्हाला रात्रंदिवस शिव्या देत आहेत, त्यांच्या हातात स्वातंत्र्यानंतरही आतापर्यंत सत्ता होती. मात्र, बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्याची त्यांची हिंमत नव्हती. तेथे बाबा साहेबांचे संविधान लागू होत नव्हते. हा मोदी आहे, जो संविधानाला समर्पित आहे. आज जम्मू-काश्मीरमध्येही आपले संविधान मोठ्या थाटात लागू झाले. पुढे सीएएला विरोध करणाऱ्यांना इशारा देत मोदी म्हणाले, हा मोदी आहे, ना भितो, ना झुकतो.

देशातील 25 कोटी लोक गरिबीतून तेव्हा बाहेर आले... -
मोदी पुढे म्हणाले, 'देशातील 25 कोटी लोक गरिबीतून तेव्हा बाहेर आले, जेव्हा आम्ही त्यांच्यासाठी रात्रंदिवस काम केले. देशातील 4 कोटी गरीब लोकाना पंतप्रधान आवास तेव्हा मिळाले, जेव्हा तुम्ही मोदींना सेवा करण्याचा आशीर्वाद दिला. भाजपने पुढील 5 वर्षांसाठी आपले संकल्प पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यात मोदीची गॅरंटी आहे. भविष्यातही देशातील सर्व गरजूंना गरीबांना मोफत रेशन मिळेल. गरीब, दलित आणि वंचितांसाठी केलेल्या योजना प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचवल्या जातील. एवढेच नाही, तर सरकार 3 कोटी नवी पक्की घरेही बांधणार आहे.


 

Web Title: Your wished Modi fulfilled The prime minister narendra modi attacked opposition in purnia bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.