नोएडा - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकची प्रचंड क्रेझ तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र लॉकडाऊनदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टिकटॉकवर लाईक्स न मिळाल्याने एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका 18 वर्षाच्या तरुणाने टिकटॉकवरील व्हिडिओवर लाईक्स मिळाले नाहीत म्हणून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. तरुणाने टिकटॉकवर एक व्हिडिओ तयार केला होता. पण लाईक्स न मिळाल्याने तो निराश झाला असल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी टिकटॉकने मदतीचा हात दिला आहे. शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकने कोरोनाशी लढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. टिकटॉकने 100 कोटींची मदत जाहीर केली आहे. भारताला टिकटॉकडून 100 कोटींचे मेडिकल इक्विपमेंट देण्यात आले आहेत. यामध्ये 4,00,000 प्रोटेक्टिव्ह सूट आणि 2,00,000 मास्कचा समावेश आहे. टिकटॉकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. 'सध्या भारतात जी कठीण परिस्थिती आहे. या परिस्थितीत आम्ही भारतासोबत आहोत' असं टिकटॉकने म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : ...अन् आईने आजारी मुलासाठी केला 6 राज्यांतून तब्बल 2700 किलोमीटरचा प्रवास
Coronavirus : कोरोनाचा भारतीय नौदलात शिरकाव, 20 नौसैनिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
Coronavirus : चिंताजनक! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाखांवर, तब्बल 154,247 जणांचा मृत्यू
कोरोनाचे रहस्य : ‘तो’ दावा आयसीएमआरने नाकारला