महाकुंभमेळ्यात फुलांचे हार विकणारी आणि आपल्या सौंदर्यामुळे प्रसिद्ध झालेली मोनालिसा भोसले हीने, काही लोक जबरदस्तीने आपल्या टेन्टमध्ये शिरले होते, असा गंभीर आरोप केला आहे. मात्र अद्याप, उत्तर प्रदेश पोलिसांनी यासंदर्भात कुठल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही. एक इन्फ्लुएन्सरने व्हिडिओ शेअर केल्यानंतर, मोनालिसा चर्चेत आली होती. ती मुळची मध्य प्रदेशातील इंदूर येथील आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हडिओमध्ये मोनालिसाने आरोप केला आहे की, "लोक तिच्यासोबत जबरदस्तीने फोटो घेण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोक माझ्या वडिलांनी पाठवल्याचे सांगून माझ्याकडे आले. मी त्यांना म्हणाले, त्यांनी पाठवले असेल तर त्यांच्याकडेच जा. मी तुमच्यासोबत फोटो काढणार नाही."
ती पुढे म्हणाली, "आता मलाही भीती वाटू लागली आहे, येथे कोणीही नाही, कोणी काही तरी करेल. येथे लाइटही नाही, काहीही नाही, तरीही लोक जबरदस्तीने आत घुसत आहेत. तेवढ्यात माझे वडील आले आणि आपण जबरदस्तीने मुलीकडे कसे आलात, असे म्हणत त्यांच्यावर ओरडले. मग मी विचारले, बाबा, यांना तुम्हीच पाठवले का? यावर बाबा म्हणाले, नाही बेटा, मी यांना पाठवले नाही." एवढेच नाही तर, रागारागाने माझा भाऊ त्यांचा फोन घेण्यासाठी गेला, तर 9 जणांनी मिळून त्याला मारहाण केली, असेही तिने म्हटले आहे.