धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाने गमावले दोन्ही पाय
By admin | Published: November 20, 2015 11:54 PM
जळगाव: धावत्या रेल्वेतून पडल्याने प्रमोद मोहन पांडव (वय २४, रा.रामचंद्रपुर जि.बळीरामपुर बिहार) या तरुणाचे गुडघ्यापासून पाय कापले गेले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवर घडली. प्रमोद याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रमोद हा सुरत येथे खासगी ठेकेदाराकडे कामाला आहे. उटपुजेसाठी तो गावाला गेला होता. तेथून परत येवून सुरत जात असताना भुसावळ येथून सुरत पॅसेंजरमध्ये बसला. ही गाडी जळगाव स्थानकावर आली असता तो पाणी घेण्यासाठी फलाटवर आला. तितक्यात गाडी सुरु झाल्याने धावत चढतांना पाय घसरल्याने तो खाली पडला. पायावर गाडी गेल्याने गुडघ्यापासून त्याचे दोन्ही पाय कापले गेले. ही घटना समजताच नागरीकांनी मोठी गर्दी केली. प्रमोदला रक्ताच्या थारोळ्यात पाहून अनेकांचा थरकाप उडाला.ही घटना समजताच लोहमाग्
जळगाव: धावत्या रेल्वेतून पडल्याने प्रमोद मोहन पांडव (वय २४, रा.रामचंद्रपुर जि.बळीरामपुर बिहार) या तरुणाचे गुडघ्यापासून पाय कापले गेले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवर घडली. प्रमोद याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रमोद हा सुरत येथे खासगी ठेकेदाराकडे कामाला आहे. उटपुजेसाठी तो गावाला गेला होता. तेथून परत येवून सुरत जात असताना भुसावळ येथून सुरत पॅसेंजरमध्ये बसला. ही गाडी जळगाव स्थानकावर आली असता तो पाणी घेण्यासाठी फलाटवर आला. तितक्यात गाडी सुरु झाल्याने धावत चढतांना पाय घसरल्याने तो खाली पडला. पायावर गाडी गेल्याने गुडघ्यापासून त्याचे दोन्ही पाय कापले गेले. ही घटना समजताच नागरीकांनी मोठी गर्दी केली. प्रमोदला रक्ताच्या थारोळ्यात पाहून अनेकांचा थरकाप उडाला.ही घटना समजताच लोहमार्गचे कर्मचारी स्वप्नील महाले हे धावून आले. त्यांनी नागरीकांच्या मदतीने प्रमोदला रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे लटकलेले दोन्ही पाय वेगळे करण्यात आले.सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.