शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
3
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
6
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
7
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
8
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
9
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
10
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
11
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
13
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
15
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
16
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
17
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
19
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
20
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...

सुरगाण्यात युवकाचा निर्घृण खून

By admin | Published: June 22, 2016 10:04 PM

सुरगाणा -दाढी करून येतो असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या तालुक्यातील माणी येथील युवकाचा मृतदेह घरापासून दूर ३० ते३५ कि.मी. अंतरावरील बोरगांव - सापुतारा महामार्गाविरल ठाणापाडा शिवारातील जंगलात मिळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सुरगाणा -दाढी करून येतो असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या तालुक्यातील माणी येथील युवकाचा मृतदेह घरापासून दूर ३० ते३५ कि.मी. अंतरावरील बोरगांव - सापुतारा महामार्गाविरल ठाणापाडा शिवारातील जंगलात मिळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. मंगळवार (दि.२१) रोजी सुरगाणा पोलिसांना वणी- सापुतारा राज्य महामार्गावरील ठाणापाडा शिवारात तालूक्यातील मोठी घोडी येथील तरूणाचा मृतदेह सापडला. जमिनीच्या वादातून आपल्या मुलाचा घातपात घडवून आणल्याची फिर्याद मयतच्यावडीलांनीदाखल केल्याने पोलिस ठाण्यात तिघांचे विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.कळवण प्रकल्प चतूर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जयराम मोरे (मोठी घोडी, हल्ली मुक्काम माणी) यांचा मुलगा कल्पेश हा त्यांच्या मालकीची स्कॉर्पिओ जिप क्र . एमएच ०४ ए एफ ०१६८ घेवून गुरूवार दिनांक १६ जून रोजी घरातून बाहेर पडला होता. तो घरी न आल्याने त्याचा सर्वत्र तपास सुरू होता. कदाचित मित्रांबरोबर गोव्याला गेला असेल असे समजून घरातील मंडळी त्याची आतूरतेने वाट पाहात होते.मंगळवारी ठाणापाडा शिवारातील दरीत तरूणाचा मृतदेह पडलेला असल्याची खबर पो.पा. गणेश जाधव यांनी सुरगाणा पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिस उपनिरिक्षक सचिन गवळी, जे.डी. सोनवणे, व पोलिस कर्मचारींनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता २२ ते २५ वयोगटातील तरूणाचा चाकूने भोसकून व डोक्यात दगड घालून अत्यंत छिन्न विछीन्न अवस्थेतील मृतदेह आढळला. मात्र मृतदेहाच्या अंगावरील टी शर्ट वर ओम बजरंगबली उदयपूर, ता.सुरगाणा या नावा वरून सदरचा मृतदेह मोठी घोडी येथील (हल्ली मुक्काम माणी) येथील कल्पेश मोरे या तरूणाचा असल्याचे सिध्द झाले. सुरगाणा ग्रामीण रूग्णालयात उत्तरिय तपासणी नंतर मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, मागील भांडणाची कुरापत काढून गावातील संशियत रमेश सोमनाथ गायकवाड व सोमनाथ बन्सु गायकवाड या पिता पुत्रासह सोमनाथ यांचा जावई यांनी संगनमताने कल्पेशचा घातपात घडवून स्कॉर्पिओ गाडी पळवून नेल्याची तक्र ार मयत युवकाचे वडील जयराम यशवंत मोरे यांनी सुरगाणा पोलिस ठाण्यात दिली आहे. कल्पेशच्या पश्चातपत्नी, चार वर्षाचा व चार मिहन्याच्या दोन मुलांसह दोन भाऊ, आई, वडील असा परिवार आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक सचिन गवळी हे करीत आहेत.फोटो :- मयत कल्पेश मोरे (२२कल्पेश् मोरे)