भिमा नदीत युवक बुडाला
By admin | Published: July 12, 2015 9:58 PM
वाडा (जि. पुणे): आव्हाट-गोरेगाव (ता. खेड) जवळ भिमा नदी पात्रात दोन युवक बुडाले त्यापैकी एकाला वाचवण्यास यश आले आहे. बुडालेल्या पवन राजेंद्र गांगड (वय २५) याचा मृतदेह आज सायंकाळी सापडला.
वाडा (जि. पुणे): आव्हाट-गोरेगाव (ता. खेड) जवळ भिमा नदी पात्रात दोन युवक बुडाले त्यापैकी एकाला वाचवण्यास यश आले आहे. बुडालेल्या पवन राजेंद्र गांगड (वय २५) याचा मृतदेह आज सायंकाळी सापडला. खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विन पाटील (रा.हडपसर, सार्थक मंडगे रा.परभणी) सुजित नायर (रा.केरळ) पवन राजेंद्र गांगड (वय २५ सध्या रा.विश्रांतवाडी, पुणे. मूळगाव भोईरे गांगर्डे, ता. पारनेर जि. अहमदनगर) हे चौघे शनिवारी भिमाशंकर येथे जाण्यास निघाले मात्र ते भिमाशंकरला जात असताना आव्हाट गोरेगाव येथे भिमा नदी किनारी थांबलेतेथे पवन हा पोहण्यासाठी नदीत उतरला. तो मध्यावर गेला असता बुडू लागला. अश्विन पाटील याने त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र दोघेही बुडू लागले. हे पाहून सोबत असलेले दोघेही घाबरले. त्यांनी आरडाओरडा केला. गोरेगावचे माजी सरपंच सीताराम महादु गवारी (वय ६५) यांनी जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली. त्यांनी अश्विन पाटील याला वाचविले. पवन गांगड याला वाचवू शकले नाही. त्यांनी अश्विन याला आपल्या घरी आणले. त्याच्या पोटातील पाणी काढले. काही वेळाने तो शुध्दीवर आला. त्याला खेड येथे दवाखाण्यात हलविण्यात आले.