शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
3
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
4
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
5
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
6
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
7
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
8
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
9
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
10
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
11
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
12
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
13
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
14
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
15
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
16
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
17
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
19
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
20
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग

युवकांनी अहिंसक मार्गाने लढा द्यावा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 6:30 AM

'आपले युवक कोणत्याही गोष्टीआधी सर्वप्रथम देशाचा विचार करतात ही उत्तम गोष्ट आहे.'

नवी दिल्ली : आपल्या मागण्यांसाठी लढा देताना जनतेने विशेषत: युवकांनी अहिंसक मार्गाचा अवलंब करावा. प्रत्येकाने आपली सामाजिक, आर्थिक उद्दिष्ट्ये घटनात्मक व सनदशीर मार्गांनीच साध्य करावीत, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी म्हटले आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात देशभर झालेल्या आंदोलनाने काही ठिकाणी हिंसक वळण घेतले होते. त्याचा थेट उल्लेख न करता राष्ट्रपतींनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात तरुणांना आवाहन केले.

राष्ट्रपती म्हणाले की, महात्मा गांधी यांनी अहिंसेची देणगी साऱ्या जगाला दिली. कोणती गोष्ट योग्य किंवा अयोग्य आहे हे ठरविण्यासाठी गांधीजींनी आचरणात आणलेले तंत्र देशातील लोकशाहीलाही लागू आहे. सत्ताधारी व विरोधी पक्ष महत्त्वाची भूमिका बजावत असतात. या दोघांनी देशाचा विकास व जनकल्याणाला बाधा येणार नाही, अशा पद्धतीनेच राजकीय मते व्यक्त करावीत.

राष्ट्रपती म्हणाले की, स्वतंत्र लोकशाही देशात असतात ते सारे अधिकार भारतीय राज्यघटनेने आपल्या नागरिकांना दिले आहेत. त्याचबरोबर न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता या चार तत्त्वांचे पालन करण्याची जबाबदारीही नागरिकांवर आहे. ही जबाबदारी महात्मा गांधीच्या विचारांची कास धरल्यास नीट पार पाडता येईल. देशाची अंतर्गत सुरक्षा महत्त्वाची असून ती मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने काही ठोस पावले उचलली आहेत.

स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यशस्वीपणे राबविली जात आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा देशातील ८ कोटी लोकांना लाभ झाला आहे. देशातील जम्मू-काश्मीर, लडाखपासून ते ईशान्य भारतातील भागांपर्यंत सर्वच ठिकाणच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. इस्रोने आजवर केलेल्या कामगिरीचाही राष्ट्रपतींनी गौरव केला. ते म्हणाले की, गगनयान मोहिम यशस्वी करण्यासाठी इस्रो अपार मेहनत घेत आहे.तिसरे दशक नवभारताच्या उदयाचेराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले की, २१व्या शतकातील तिसरे दशक हे नवभारताच्या उदयाचे असेल. नव्या पिढ्या देशाचे भवितव्य घडवतील. आपले युवक कोणत्याही गोष्टीआधी सर्वप्रथम देशाचा विचार करतात ही उत्तम गोष्ट आहे.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद