ज्येष्ठांचा मान तरुणांनी ठेवावा : वळसे पाटील
By admin | Published: April 30, 2016 1:37 AM
तळेघर : आयुष्यामध्ये जीवन जगत असताना ज्या समाजाने व मातीने आपणाला मोठं केलं, त्यांची आठवण व त्यांनी केलेले ऋण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी विसरू नका. संसार तर सगळेच करतात. तुम्ही पण करणार आहात. पण या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पुढील भविष्यात आनंद देण्यासाठी महत्त्वाच्या आहेत, असा सल्ला विधानसभेचे माजी अध्यक्ष व आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिला.
तळेघर : आयुष्यामध्ये जीवन जगत असताना ज्या समाजाने व मातीने आपणाला मोठं केलं, त्यांची आठवण व त्यांनी केलेले ऋण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी विसरू नका. संसार तर सगळेच करतात. तुम्ही पण करणार आहात. पण या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पुढील भविष्यात आनंद देण्यासाठी महत्त्वाच्या आहेत, असा सल्ला विधानसभेचे माजी अध्यक्ष व आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिला. तळेघर (ता. आंबेगाव) येथे श्री वरसुबाई माता आदिवासी कल्याणकारी संस्था व तळेघर ग्रामस्थ त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पश्चिम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सामुदायिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी वळसे पाटील बोलत होते. वधूवरांना शुभेच्छा देताना वळसे पाटील म्हणाले, की येथील सामुदायिक विवाह सोहळा हा इतरांसाठी प्रेरणादायी आहे. काळाची गरज ओळखून आदिवासी भागातील कार्यकर्ते समाजोपयोगी कार्यक्रम राबवत आहेत. हे वर्ष आपल्या सर्वांच्या दृष्टीने अडचणीचे वर्ष आहे. आज दुष्काळी परिस्थिती आहे. एका बाजूला पाणी-पाऊस कमी झाला म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला अडचणींचा सामना करावा लागला. आज पाण्याचे स्रोत आटले आहेत. त्यामुळे माणसांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपल्या परिसरात निर्माण झाला आहे. आपल्या आदिवासी भागातील आदिवासी जनतेसाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने करा, असा सल्लाही आपल्या कार्यकर्त्यांना वळसे पाटील यांनी दिला. तळेघर येथे सोहळ्याचे हे तिसरे वर्ष आहे. आपल्या भागातील आदिवासी बांधव जमीन, गाई, बैल, म्हैस विकून मुला-मुलींच्या लग्नासाठी कर्जबाजारी होऊ नयेत यासाठी तळेघर ग्रामस्थ व या आदिवासी कल्याणकारी संस्थेच्या वतीने या भागात पुढाकार घेऊन समाजाचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा. मुलगी आई-वडिलांना बोजा वाटू नये यासाठी विवाह सोहळ्यात होणारे मानपान, आहेर, हुंडा, कपडे व पाहुणचार या अनिष्ट प्रथा बंद करून विवाहसोहळा करण्यात आला. यामध्ये आदिवासी समाजाची १० जोडपी विवाहबद्ध झाली. आपल्या आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात सामुदायिक सोहळे होत आहेत. माझ्या आदिवासी बांधवांचा पैसा, वेळ, धावपळ वाया न जाता सोहळा थाटात संपन्न होत आहे. समाजाने आदिवासी बांधवांचा आदर्श घ्यावा, असा उपदेशही या वेळी वळसे पाटील यांनी केला. (जोड पुढे आहे.............)