भुवनेश्वर : प्रख्यात यूट्यूबर कामिया जानी हिने जगन्नाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. गोवंश मांसाला समर्थन देणाऱ्या कामियाच्या मंदिर प्रवेशाने हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करून भाजपने तिच्या अटकेची मागणी केली आहे.
कामियाने १६ डिसेंबर रोजी यूट्यूब चॅनल ‘कर्ली टेल्स’वर एक व्हिडीओ जारी केला. त्यात ती मंदिरात बीजेडी नेते व्ही. के. पांडियन यांच्याशी बातचीत करताना दिसते. ओडिशा भाजपचे सरचिटणीस जतिन मोहंती यांनी म्हटले की, गोवंशाच्या मांसाचा प्रचार, प्रसार करणाऱ्या व्यक्तीस मंदिरात प्रवेश देण्यास परवानगी नाही.