नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या कन्या आणि वायएसआर तेलंगणा पक्षाच्या संस्थापक वाय. एस. शर्मिला यांनी गुरुवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी वायएसआर तेलंगणा काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली.
पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण पूर्ण करू, असे त्या म्हणाल्या. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला आगामी निवडणुकीत फायदा होणार आहे.शर्मिला या आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या धाकट्या बहीण आहेत.
खूप आनंद होतोय...त्या म्हणाल्या की, काँग्रेस सर्वात मोठा आणि सर्वात धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, कारण तो सर्व समुदायांची सेवा करतो आणि सर्व वर्गांना एकत्र करतो. वायएसआर तेलंगणा पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करताना मला खूप आनंद होत आहे.