शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

UP Election 2022: योगींच्या गडात आदित्य ठाकरेंचा हुंकार! यूपीमध्ये करणार शिवसेना उमेदवारांचा प्रचार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 11:11 AM

UP Election 2022: आदित्य ठाकरे, संजय राऊत शिवसेना उमेदावारांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत.

लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. सत्ताधारी भाजपचे योगी आदित्यनाथ सरकार आणि विरोधकांमध्ये तुंबळ आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेनाही आता प्रचारात उतरणार आहे. महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) उत्तर प्रदेश दौऱ्यावर असून, काही ठिकाणच्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. 

आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी प्रचारात सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशमधील डुमरियागंज विधानसभा मतदारसंघातील सिद्धार्थनगर, प्रयागराज जिल्ह्यातील कोरांव येथे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारसभांमध्ये आदित्य ठाकरे सामील होणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

शिवसेनेचे ३९ उमेदवार निवडणूक रिंगणार

भाजपवर सातत्याने टीका करताना कडवी टक्कर देण्यासाठी शिवसेनेने आपले उमेदवार निवडणूक रिंगणार उतरवले आहेत. भाजपला देशात आव्हान उभे करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. एकूण ४०३ जागांसाठीच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ३९ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती मिळाली आहे. वास्तविक शिवसेनेने ५९ उमेदवारांना तिकीट दिले होते. मात्र, यातील २२ जणांच उमेदवारी अर्ज बाद करण्यात आल्याने आता शिवसेना उमेदवारांची संख्या ३९ वर आल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू झाली. हे मतदान सात टप्प्यांत पार पडणार असून, अखेरच्या टप्प्यातील मतदान ७ मार्च रोजी आहे. उत्तर प्रदेशसह देशातील अन्य पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी एकत्रितपणे १० मार्च रोजी होणार आहे.  

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Aaditya Thackerayआदित्य ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाyogi adityanathयोगी आदित्यनाथ